Mumbai Fire: जोगेश्वरीत फर्निचर मार्केटला भीषण आग, अनेक गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Furniture Market in Jogeshwari: जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा फर्निचर मार्केटला सकाळी अकरा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एस व्हीं रोडवरील अजित ग्लासजवळच्या फर्निचर मार्केटचे अनेक गाळे जळून खाक झाले.
fire at furniture market in Jogeshwari
fire at furniture market in Jogeshwarisaam tv

Mumbai News: जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा फर्निचर मार्केटला सकाळी अकरा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एस व्हीं रोडवरील अजित ग्लासजवळच्या फर्निचर मार्केटचे अनेक गाळे जळून खाक झाले.

या आगीच्या घटनेची माहिती मिळतात मुंबई अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या अग्नशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी एस वी रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे.

fire at furniture market in Jogeshwari
Onion Price News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

दरम्यान आगीची घटना लागली त्यावेळी या ठिकाणी असणारे दुकानदार आपले दुकानातील उरलेसुरले सामान बाहेर काढण्यासाठी धडपड करत असताना देखील पाहायला मिळाले. या आगीत मोठं नुकसाच झाल्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com