AI माणसाला संपवणार? AIच्या गॉडफादरची भविष्यवाणी?

AI Could Become Smarter Than Humans in 18 Months: आजवर अनेक दिग्गजांनी AIचे धोके ओळखून आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मात्र, AIच्या गॉडफादरनंच खळबळजनक दावा केलाय. काय म्हणालेत जेफ्री हिंटन?... AI मुळे पदाचा राजीनामा देणारे दिग्गज कोण आहेत?... पाहूयात या रिपोर्टमधून...
Geoffrey Hinton warns
Geoffrey Hinton warnssaam tv
Published On: 

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIमध्ये होत असलेले बदल पाहता संपूर्ण मानवजात AIच्या नियंत्रणाखाली येईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीये. म्हणूनच की काय आता दस्तुरखुद्द AIचे गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी AIच्या वाढत्या वापराबाबत जगाला धोक्याचा इशारा दिलाय.. काय म्हणालेत जेफ्री हिंटन ते पाहूयात...

3 वर्षांत AIकडून माणसाचा खेळ खल्लास?

AI माणसांपेक्षा जास्त स्मार्ट होण्यासाठी पूर्वी 10 वर्ष लागतील असा अंदाज होता, मात्र तंत्रज्ञानाच्या वेगवान गतीमुळे आता हा काळ केवळ 18 महिने उरलाय. AI सुपर-इंटेलिजेंट बनल्यास माणूस नव्हे तर AIच माणसावर नियंत्रण ठेवणार. पुढील 3 वर्षांत माणसांच्या हातातून नियंत्रण पूर्णपणे जाण्याचा धोका वाढणार. AI सर्व यंत्रणांवर आणि आवश्यक प्रणालींवर ताबा मिळवेल. यामुळे माणसांचे स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे संपेल.

AIच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचा इशारा देणारे जेफ्री हिंटन हे काही पहिलेच व्यक्ती नाहीयेत. याआधी उद्योगपती बिल गेटस्, एलन मस्क यांच्यासह दिग्गजांनी जगाला सावध केलंय. ऑल्टमन, हसबिस आणि अमोडेई यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी AI मुळे मानवजातीचा अंत होण्याची जोखीम महामारी आणि आण्विक युद्धासारखी मोठी असल्याचं म्हटलं होतं. इतकंच काय... AIच्या संभाव्य धोक्याच्या भीतीमुळे अनेक तज्ज्ञांनी नोकरीदेखील सोडलीये...

मे 2023 मध्ये AIचे निर्माते जेफ्री हिंटन यांनी AIच्या वाढत्या वापरामुळे गुगलची नोकरी सोडली होती.

मे 2024 मध्ये OpenAI चे को-फाऊंडर इल्या सुत्सकेवर यांनी राजीनामा दिला होता

मे 2024 मध्ये जेन लीक यांनी OpenAI मधून सुपर अलाईनमेंट टीमच्या सहसंस्थापकपदाचा राजीनामा दिला होता

सप्टेंबर 2026 मध्ये जेकब कॉक्सन यांनी एंथ्रोपिकच्या AI रिसर्चरपदाचा राजीनामा दिला होता.

गूगल डीपमाईंडचे रिसर्च इंजिनीयर बिलाल चुगताई यांनी जुलैमध्ये तर AI सेफ्टी रिसर्चर जोश एंगेल्स यांनी सप्टेंबर 2026 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.

शिक्षणापासून अगदी वैद्यकीय क्षेत्रापर्यंत AI उपयुक्त ठरतोय यात शंका नाही. मात्र, आता या अनियंत्रित घोडदौडीला वेसण घातली नाही, तर प्रगतीचे हे साधन मानवाला संपवायला वेळ लावणार नसल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. AI मुळे माणसाचं महत्त्व संपुष्टात येणार का? AI थेट मानवजातीच्या अस्तित्वावरच घाला घालणार का? असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.