GEN Z आंदोलनाला पहिलं यश, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, मात्र तरुणाईचं जिंकली

Gen Z Protest Success Delhi Youth Movement Impact India: जेन झीच्या आंदोलनानं दिल्लीतल्या पोलादी व्यवस्थेला हादरा दिला आणि पहिलं यश मिळवलं...मात्र या आंदोलनाच्या यशामुळे देशातल्या मोडीत निघालेल्या चळवळींना कसं बळ मिळणार त्यावरचा हा विशेष रिपोर्ट
Gen Z protesters celebrate after securing a major victory in Delhi, marking a turning point for youth-led movements in India.
Gen Z protesters celebrate after securing a major victory in Delhi, marking a turning point for youth-led movements in India.saam tv
Published On

सत्तेच्या आणि व्यवस्थेच्या अहंकाराला जेव्हा तरुणाईचं वादळ धडकतं, तेव्हा दिल्लीचं तख्तही झुकतं. आणि देशभरातील तरुणाई इथल्या महापुरुषांच्या नावानं एकच घोषणाबाजी करू लागते... 35 दिवसांपासून देशातल्या तरुणांनी सत्ताधाऱ्यांविरोधात छेडलेल्या या आंदोलनाचा शेवट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानं झाला आणि जेन झी आंदोलनाला पहिलं यश मिळालं....त्यामुळे जेन झी आंदोलकांनी याला स्वतंत्र्याचा दुसरा लढाचं म्हटलयं...

मात्र या आंदोलनाचे यश केवळ एका राजीनाम्यापुरते मर्यादित नाही. देशात ज्या-ज्या लोकशाही मार्गाने चाललेल्या चळवळी प्रशासनांनं, व्यवस्थेने दाबून टाकल्या होत्या, त्या सर्व आंदोलनांना या विजयामुळे एक नवीन संजीवनी आणि बळ मिळालयं. Gen Z चे हे पहिले ऐतिहासिक आंदोलन देशातील चळवळींचा नवा किरण कसे ठरले पाहूयात...?

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना एकत्र आणून जंतरमंतरवर तरुणांची धडक.

'होय, मी झुरळ आहे' या व्यंगात्मक टॅगलाईनला आंदोलनाचे हत्यार बनवले

कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता 30 वर्षांच्या अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या पोलादी व्यवस्थेला धडक

वेळोवेळी लाठीहल्ला आणि दडपशाही होऊनही आंदोलनावर ठाम

सोनम वांगचुक यांना उचलून नेलं तरी आंदोलक प्रधानांच्या मागणीवर ठाम

देशात ठिकठिकाणी आंदोलनाचं लोण पोहोचलं आणि सत्ताधाऱ्यांना नमतं घ्यावं लागलं

प्रधानांनी राजीनामा दिला आणि तरुणाईचा ऐतिहासिक विजय

गेल्या काही वर्षांत देशाभरात अनेक जनआंदोलनं झाली. शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांचे लढे पोलिसांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या Gen Z च्या आंदोलनाने देशातील अनेक संघटनांना आणि चळवळींना नवं बळ दिलंय. लोकशाहीत जनतेचा आणि तरुणांचा आवाज कधीही दाबता येत नाही, हेच या लढ्याने पुन्हा सिद्ध केले. तसच कामगार, शेतकरी आणि स्थानिक प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनांना पुन्हा मैदानात उतरण्याचं धैर्य मिळालंय. त्यामुळे लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांसाठी नवा अध्याय सुरु झालाय...

ज्या Gen Z तरुणाईला सोशल मीडियात आणि रिल्समधेच मग्न समजले जात होते, त्याच तरुणाईने आज देशाच्या राजकारणाला आणि व्यवस्थेला मोठा धडा शिकवलाय... दिल्लीतील या विजयाची धग आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली असून, दडपून टाकलेल्या प्रत्येक चळवळीला आता नवा श्वास मिळालाय...त्यामुळे प्रधान यांच्या राजीनाम्यानं या आंदोलनाचा शेवट झाला असला तरी ही देशभरातल्या मोडीत निघालेल्या चळवळींसाठी नवी सुरूवात मानली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com