Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Gaza News update : इस्त्राईलच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीत उपासमारीनं लोकांचा मृत्यू होतोय. तिथल्या नागरिकांचं जगणं कठीण झालंय. आतापर्यंत गाझात किती जणांचा मृत्यू झालाय? बलाढ्य राष्ट्रांची काय भूमिका आहे?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
gaza news
gazaSaam tv
Published On

गाझामध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू होऊन 22 महिने झालेत. त्याचे भीषण परीणाम समोर येतायेत. गाझात युद्धामुळे उपासमारीनं 124 लोकांचा मृत्यू झालाय. ज्यात 81 लहान मुलं आहेत. जुलै महिन्यात अन्नावाचून तडफडून 40 लोकांनी शेवटचा श्वास घेतलाय. गाझामध्ये महागाईने उच्चांक गाठलाय. केवळ 50 ग्रॅम बिस्किटाच्या पॅकेटसाठी 750 रुपये मोजावे लागतायेत. पैसे काढण्यासाठी 45 टक्के कमीशन द्यावं लागतंय.. गाझातील अनेक ठिकाणी लोक मीठ खाऊन आणि पाणी पिऊन जगण्यासाठी संघर्ष करतायेत.

gaza news
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

गाझात उपासमारीनं जगणं कठीण!

गाझातील एक तृतीयांश लोकसंख्येला अनेक दिवसांपासून अन्न मिळत नाही

20 लाखांहून अधिक लोकसंख्या पूर्णपणे बाह्य मदतीवर अवलंबून असल्याची शक्यता

युद्धामुळे गाझामधील उपासमारीची अधिकृत माहिती नाही

'गाझा मीडिया ऑफिस'च्या माहितीनुसार, 70% पेक्षा जास्त इमारती उद्ध्वस्त

19 लाख नागरिक घरातून विस्थापित

gaza news
Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

दरम्यान गाझामधील उपासमारीवर जगभरातून चिंता व्यक्त होतेय. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने एक संयुक्त निवेदन जारी केलयं.. त्यात 'ओलिसांच्या सुटकेपूर्वी तत्काळ युद्धबंदी झाली पाहिजे. आणि गाझातील नागरिकांना अन्न, पाणी पुरवले पाहिजे, असं म्हटलयं.. त्यामुळे आतातरी गाझातील नागरिकांची उपासमारी थांबणार का? गाझापट्टीत शांतता नांदणार का? आणि मुख्य म्हणजे इस्त्राईल देखील मानवतेच्या दृष्टीकोनातून आपली जबाबदारी पार पाडत गाझामध्ये मदतकार्य कारणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com