Zoya Khan : जोया खानचा पाय आणखी खोलात; दिल्लीला हादरवणाऱ्या हत्याकांडात गँगस्टरची बायको अडकली

Zoya Khan News : जोया खानचा पाय आणखी खोलात गेला आहे. दिल्लीला हादरवणाऱ्या हत्याकांडात गँगस्टरची बायको अडकली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? वाचा
Zoya Khan News
Zoya Khan saam tv
Published On

गँगस्टर हाशिम बाबाची बायको जोया खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जोया खानला नादीर शाह हत्या प्रकरणात अटक केली आहे. जोयाला याआधी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. हत्या प्रकरणात अटक केल्यानंतर जोयाला पाटियाला हाऊस कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Zoya Khan News
Pune Crime : ८ जणांनी कोयता अन् तलवारीने सपासप वार केले, तरूणाचे हात-पाय तोडले, मध्यरा‍त्री कोथरूडमध्ये थरार

मागील वर्षी दिल्लीच्या ग्रेटर कैलाश भागात जिम संचालक नादिर शाह यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. नादिर शाह यांच्या हत्याकांडाने संपूर्ण दिल्लीत खळबळ उडाली होती. या हत्याकांडानंतर दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आतापर्यंत या प्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नादिर शाह प्रकरणात हाशिम बाबा गँगचा महत्वाचा हात असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांचा दावा आहे की, तुरुंगात असलेल्या हाशिम बाबाचा संपूर्ण गँग पत्नी सांभाळत आहे. नादिर शाह यांच्या हत्येतही जोया खानची महत्वाची भूमिका होती'

Zoya Khan News
Jalgaon Crime : महाशिवरात्रीच्या तोंडावर पुरातन महादेव मंदिरात चोरी; पिंडीवरील सोन्याच्या पत्र्यासह त्रिशूल नेला काढून

दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, 'नादिर शाह प्रकरणात पूर्ण खुलासा होणे बाकी आहे. जोया खानकडून पोलीस चौकशीत महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून सद्दाम आणि सलमानला अटक करणे बाकी आहेत. नादिर शाह हत्या प्रकरणात हत्यारे जप्त करण्यात आलेली नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की, 'आरोपी ऐकमेकांना व्हॉट्सअॅपवरून संवाद साधायचे'.

Zoya Khan News
Jalgaon Crime : जळगाव एमआयडीसीतील कंपनीतच केला हात साफ; तीन लाखांची रोकड लांबविली, चोरटे सीसीटीव्हीत कैद

जोया खानच्या वकिलांचं म्हणणं आहे की, 'हत्या प्रकरणात कोणत्याही आरोपीने जोयाचं नाव घेतलं नव्हतं. जोयावर याआधी दोन प्रकरणात सहभागी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. जोयाचे वकीलाच्या माध्यमातून म्हटलं की, 'माझा एकच गुन्हा आहे की, मी हाशिम बाबाची बायको आहे. नादिर शाह प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com