Assam Police: आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार (Physically Abused) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कारमध्ये या मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी आसाम पोलिसांनी (Assam Police) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्यांना अटक केली आहे. ही घटना आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. चार तरुणांनी एका 13 वर्षांच्या मुलीला कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांनी आसामच्या राष्ट्रीय महामार्ग 31 सीवर नेऊन धावत्या कारमध्ये तिच्यावार आळीपाळीने सामूहिक अत्याचार केले. हा परिसर डोटमा शहराजवळ आहे.
पोलिसांना पेट्रोलिंग करताना या कारवर संशय आला त्यांनी पाठलाग करत कारला रोखले. या कारमध्ये पोलिसांना एका मुलीसह ४ तरुण दिसले. पोलिसांनी या सर्वांना पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मुलीने पोलिसांना या चार तरुणांनी अत्याचार केल्याचे सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी संध्याकाळपर्यंत चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
आरोपींविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (POCSO) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोक्राझार येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसैन आणि मोमिनुर रहमान अशी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. या सर्वांचे वय 19 ते 24 वर्षांदरम्यान असून सर्वजण धुबरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
याप्रकरणाचा तपास करत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी चार आरोपींपैकी एकाला ओळखत होती. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांशी मॅसेजवर बोलायचे. त्यानंतर त्यांनी भेटायचे ठरवले.
आरोपीने मुलीला घराबाहेर भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे मुलगी त्याला भेटायला आली. त्यावेळी आरोपी कार घेऊन आला होता. या कारमध्ये त्याच्यासोबत त्याचे तीन मित्र बसले होते. आरोपीने मुलीला कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर धावत्या कारमध्ये साहमूहिक आत्याचार केले. सध्या या मुलीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.