रविवार ठरला अपघातवार! 35 जणांचा मृत्यू; धुळ्याच्या पवार कुटुंबातील 9 जणांचा करूण अंत, देशात हळहळ

Sunday Road Accidents 28 Killed Across Four States India: देशात रविवार ठरला अपघातवार! राजस्थान, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सहा भीषण अपघातांत 28 जणांचा मृत्यू झाला. कोटामध्ये धुळेच्या पवार कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, तर गुजरातच्या कच्छमध्ये आर्मी कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी अंत.
Tragic Sunday on Indian Roads
Tragic Sunday on Indian Roadssaam tv
Published On: 

देशात रविवार 22 नोव्हेंबरची सकाळ अपघातांच्या घटनांनी सुरू झाली आहे. राजस्थान, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये सहा भीषण अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. राजस्थानमधील खाटू श्याम येथे देवदर्शन करून परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा कोटामध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत पवार कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गांभिरीत्या जखमी आहेत. तर गुजरातच्या कच्छमध्ये झालेल्या भीषण अपघातात आर्मी कुटुंबातील 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. कुठे कार आणि ट्रकची धडक, तर कुठे वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Tragic Sunday on Indian Roads
भाजप खासदाराच्या समर्थकांकडून NDAच्या आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

कोटामध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत.

जोधपूरमध्ये टेम्पो आणि कारची धडक; 3 जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये शनिवारी संध्याकाळी आणखी एक भीषण अपघात झाला. कार आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.

Tragic Sunday on Indian Roads
डीलिमिटेशनसाठी राज्यातील खासदारांना 150 कोटी; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

कच्छमध्ये आर्मी कुटुंबावर काळाचा घाला; 7 जणांचा मृत्यू

गुजरातमधील कच्छ जिल्हयात भुज-खावडा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने एका कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आर्मी कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

जुनागढमध्ये कार उलटून आग; 3 जणांचा मृत्यू

गुजरातमधील जुनागढ शहरातील भीषण अपघाताची घटना घडली. केशोद-बलागाम मार्गावरील खामिधाना गावाजवळ भरधाव कार दगडला धडकून उलटली. त्यानंतर कारला आग लागली. या दुर्घटनेत कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. तर कृष्णाबेन नावाच्या महिलेला गंभीर अवस्थेत केशोद सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये एकूण चार जण प्रवास करत होते.

Tragic Sunday on Indian Roads
Transfer News : पोलीस दलात मोठे फेरबदल! तब्बल २७३ DSP आणि एका IPS अधिकाऱ्याची बदली, कुणाची कुठे झाली नियुक्ती

पाटण्यात भीषण अपघात तीन महिलांसाह 4 जणांचा मृत्यू

बिहारची राजधानी पाटणा येथे रविवारी पहाटे सुमारे 4 वाजता भीषण रस्ते अपघात झाला. बाढ अनुमंडल परिसरातील अथमलगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सबनिमा पेट्रोल पंपाजवळ कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

फतेहपूरमध्ये बस आणि ट्रकची धडक; कंडक्टरसह दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये कानपूर-प्रयागराज महामार्गावर रविवारी पहाटे सुमारे 3 वाजता भीषण अपघात झाला. खागा कोतवाली परिसरातील भोगलपूर चौकात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टूरिस्ट बसची पुढे चाललेल्या बटाटे वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक बसली. ही बस गाझियाबादहून वाराणसीकडे जात होती. बसमध्ये चालक आणि कंडक्टरसह एकूण 40 प्रवासी होते. या अपघातात बस कंडक्टर आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, राजस्थान, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये झालेल्या सहा अपघातांमध्ये 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.