Delhi Building Collpases
Delhi Building CollpasesSaam Tv

Delhi: आझाद मार्केटमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 3 कामगारांचा मृत्यू

6-7 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Published on

दिल्ली - आझाद मार्केट परिसरात बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळली (Building Collapse) आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर 6-7 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

आझाद मार्केट परिसरातील शीश महालमधील इमारतीत बांधकाम सुरू होते. ती इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत आतापर्यंत 3 मजुरांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

हे देखील पाहा -

बचाव पथकासोबत स्थानिक लोकही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत असली तरी नेमका आकडा कोणालाच माहीत नाही, असे तेथे उपस्थित लोकांचे म्हणणे आहे.

Delhi Building Collpases
Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या पाठपुराव्याला यश; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळल्याची माहिती सकाळी 8.30 च्या सुमारास मिळाली. शीश महल परिसरात घर क्रमांक 754 पडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जवळपास 6-7 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com