
Former Prime Minister Manmohan Singh passes away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झालं. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून मनमोहन सिंह यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. गेल्या काही डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर वयोमानानुसार विविध आजारांसाठी उपचार सुरू होते.
दिल्लीतील आपल्या निवासस्थानी असताना आज मनमोहन सिंह अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. सर्व तपासणी केल्यानंतर गुरूवारी रात्री ९:५१ वाजता डॉक्टरांनी मनमोहन सिंह यांना मृत घोषित केलं.
डॉ. मनमोहन सिह हे देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जातात. १९९१ साली त्यांनी भारताच्या अर्थमंत्री म्हणून काम करताना देशाला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढलं होतं. २००४ ते २०१४ या काळात ते दोन टर्म त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषावले. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
एम्स रूग्णालयाने काय सांगितले ? मनमोहन सिंह यांचा मृत्यू नेमका का झाला?
एम्स रूग्णालयात मनमोहन सिंह यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर एम्सकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेय. "अत्यंत दु:खासह, आम्ही भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (वय ९२) यांच्या निधनाची बातमी देत आहोत. वयासंबंधी आजारांवर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. २६ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या निवासस्थानी अचानक बेशुद्ध पडले. घरीच तातडीने जीवनरक्षक उपचार सुरू करण्यात आले. त्यांना ८:०६ वाजता नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या वैद्यकीय आपत्कालीन विभागात आणण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. रात्री ९:५१ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले," असे एम्सने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.