माजी पंतप्रधानांचा गायिकेसोबत किस करतानाचा फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ, कोणत्या देशात घडला प्रकार?

canada former prime minister viral photo : कॅनडाचे माजी पंतप्रधानांचा गायिकेसोबत किस करतानाचा फोटो व्हायरल झालाय. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
canada former prime minister
canada former prime minister viral photoSaam tv
Published On
Summary

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि गायिका कॅटी पेरीचा किस करतानाचा फोटो व्हायरल

कॅलिफोर्नियामधील समुद्रकिनारी सुट्टी दरम्यान घडली घटना

ट्रूडो यांच्या अंगावर शर्ट नव्हतं, त्यांच्या टॅटूमुळे झाली ओळख

याआधीही दोघं एका डिनर डेटवर दिसले होते

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि प्रसिद्ध गायिका कॅटी पेरी हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचा कॅलिफोर्नियामध्ये किस करताना क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. या फोटोमध्ये ट्रूडो यांच्या अंगावर शर्ट नव्हतं.

ट्रूडो आणि कॅटी पेरी हे व्हायरल फोटोमध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. दोघे रोमँटिक मूडमध्ये दिसताहेत. द डेली मेलच्या वृत्तानुसार, एका जहाजावर दोघे कॅमेऱ्यात कैद झाले. सुरुवातीला गायिका केटी उभी होती. त्याचवेळी एक व्यक्ती तिथे आला. या व्यक्तीच्या अंगावरील टॅटूमुळे हे जस्टिन ट्रूडो असल्याची ओळख पटली.

canada former prime minister
Maharashtra Politics : अजित पवार गटाच्या आमदारावर हल्ला; तोंडाला रुमाल बांधून आलेल्यांकडून कारवर दगडफेक

ट्रूडो आणि पेरी या आधी दोघे जुलै महिन्यात एका डिनर डेटवर दिसले होते. त्यावेळी देखील दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. त्या रेस्टॉरंटमधील लोकांच्या दाव्यानुसार, दोघे एकत्र गप्पा मारत जेवण करत होते. रेस्टॉरंटमध्ये दोघांनी एकत्र कॉकटेल , लॉबस्टर आणि अपेटायझरचा आस्वाद घेतला.

canada former prime minister
India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

कॅटी पेरी याआधी अभिनेता ऑरलँडो ब्लूमसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांचं काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं. पेरीने कॉमेडियन रसेल ब्रांडशी लग्न केलं होतं. त्यांचा संसार फक्त दोन वर्ष टिकला. त्यांचं २०१० साली लग्न झालं. तर २०१२ साली घटस्फोट झाला. तर ट्रूडो यांनी २००५ साली सोफी यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर २०२३ साली त्यांचा घटस्फोट झाला. ट्रूडो यांना दोन मुलं आहेत.

canada former prime minister
Dipika padukone : दीपिका पदुकोण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; हिजाब घातल्याने ट्रोल, VIDEO
Q

 माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो कुणासोबत दिसले?

A

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो प्रसिद्ध अमेरिकन गायिका कॅटी पेरीसोबत दिसले.

Q

संपूर्ण घटना कुठे घडली?

A

सदर घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com