Delhi Smuggling Case: दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटी रुपयांच्या नोटा जप्त

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताजिकीस्तानातील ३ नागरिकांची झडती घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे ७,२०००० डॉलर आणि 4,66,200 युरो आढळले. या नोटांची किंमत १० कोटी रुपये आहे.
Delhi Smuggling Case
Delhi Smuggling Casepinterest
Published On

Delhi News: दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने विदेशी चलनाच्या नोटा जप्त केल्या आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताजिकीस्तानातील ३ नागरिकांची झडती घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे ७,२०००० डॉलर आणि 4,66,200 युरो आढळले. या नोटांची एकूण किंमत १० कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी इस्तंबुलच्या विमानात बसणार होते. त्यावेळी या आरोपींना अटक करण्यात आली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

Delhi Smuggling Case
Ranu Sahu Arrested : IAS अधिकारी रानू साहू यांना अटक; कोळसा घोटाळाप्रकरणी ED ची सर्वात मोठी कारवाई

या तीन आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सामावेश आहे. या आरोपींनी बुटामध्ये नोटा लपवल्या होत्या. भारतामध्ये विदेशी नोटांचा इतका साठा कधीही सापडला नव्हता.

८ कोटी रुपयांचे सोन जप्त

१३ जून रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोन्याची सर्वात मोठी कारवाई केली आहे . या विमानतळावर १६.५७० किलो किंमतीचे सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ८.१६ कोटी रुपये आहे. या प्रकरणी आजी-नातीला अटक करण्यात आली आहे.

Delhi Smuggling Case
Dudhsagar Waterfalls: गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी; सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा मोठा निर्णय

या प्रकरणातील एका आरोपीला सहज पकडण्यात यश आलं. परंतु दुसऱ्या आरोपीला पकडण्यास मेहनत घ्यावी लागली. कारण या आरोपीने विमानतळावर येताच कपडे बदलेले होते. या आरोपीला ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान, आरोपीकडून बॅग आणि कपड्यातून २६५ सोन्याची चैन आणि ९ ब्रेसलेट आढळून आले. या सोन्याचं वजन १६.५७० किलो इतकं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com