Dudhsagar Waterfalls: गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी; सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा मोठा निर्णय

Dudhsagar Waterfalls: सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा पर्यटनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Dudhsagar Waterfalls
Dudhsagar WaterfallsSaam tv
Published On

Dudhsagar Waterfalls: सातारा जिल्ह्यातील ओझर्डे धबधबा, महाबळेश्वर नजीकच्या लिंगमळा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातल्यानंतर गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावरही पोलीस प्रशासन आणि वन खात्याने बंदी घातली आहे. फेसाळणारा धबधबा पाहणं अनेकांची इच्छा असते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा पर्यटनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील कुळे येथे आहे. या धबधब्यावर जाण्यासाठी रेल्वेच्या बाजूने चालत जावे लागते. या धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालून खाली उतरतात. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dudhsagar Waterfalls
Ratnagiri Rain Updates : तोणदे गावात पाणी शिरलं, मगरींच्या भीतीने युवकाने काढली रात्र झाडावर (पाहा व्हिडीओ)

दूधसागर स्टेशनवर उतरल्यास कारवाई होणार

या वर्षी झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. दूधसागर स्टेशनवर कोणीही उतरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणी उल्लंघन केल्यास रेल्वेच्या कलम १४७ नुसार कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे

शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात. गेल्या आठवड्यात पोलिसांनी पर्यटकांना रेल्वे स्थानक परिसरात रोखलं होतं.

प्रशासनाचा मोठा निर्णय

मुसळधार पावसामुळे दूधसागर धबधबा ओसंडून वाहत आहे. फेसाळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धबधब्यावर जाण्याचा प्रवास खूप जीवघेणा आहे. या धबधब्यावर जाताना अनेक अपघातही होतात. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे .

Dudhsagar Waterfalls
Bengaluru Flight News: विमानानं टेक ऑफ केल्यानंतर प्रवाशानं इमर्जन्सी डोअर उघडण्याचा केला प्रयत्न; बेंगळुरूत काळजात धडकी भरवणारी घटना

सातारा जिल्ह्यातील धबधब्यांवर जाण्यास बंदी

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ओझर्डे धबधबा आणि महाबळेश्वर नजीकच्या लिंगमळा धबधबा येथे पर्यटनास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा म्हणजे कोयना धरण परिसरातील ओझर्डे धबधबा आहे. हा फेसाळणारा धबधबा पाहणं म्हणजे सुखद अनुभव असतो. अतिवृष्टीमुळे सध्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसानंतर पुन्हा हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com