Accident News: लग्नाचा आनंद क्षणात मावळला, कार अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू; हृदयद्रावक घटना

Jharkhand Accident News: लग्न समारंभ आटोपून परतत असताना भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
five people died in car accident giridih jharkhand
five people died in car accident giridih jharkhand Saam TV
Published On

Jharkhand Accident News

लग्न समारंभ आटोपून परतत असताना भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना झारखंडमधील गिरिडीहमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

five people died in car accident giridih jharkhand
Private Job Reservation: खट्टर सरकारला उच्च न्यायालयाचा दणका, खासगी क्षेत्रातील ७५ टक्के आरक्षणाचा कायदा रद्द

सगीर अंसारी, युसूफ मियां, इम्तियाज अंसारी, सुभान अंसारी, अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हे गिरिडीह जिल्ह्यातील थोरिया येथील रहिवासी आहेत. ते गुरुवारी तिकोडीह येथे नातेवाईकाच्या विवाह समारंभारासाठी गेले होते. विवाह समारंभाचा कार्यक्रम आटोपून कारने परतत असताना बागमारा पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

काही कळण्याच्या आत कार अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळली. या भयानक घटनेत कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

five people died in car accident giridih jharkhand
Manoj Jarange News: मनोज जरांगे यांचा बॅनर फाडला, पोलिसांत गुन्हा दाखल; एफआयआरमध्ये छगन भुजबळांचं नाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com