गुजरातच्या समुद्रात मोठी दुर्घटना! 13 ते 15 बोटी बुडाल्याची भीती
गुजरातच्या समुद्रात मोठी दुर्घटना! 13 ते 15 बोटी बुडाल्याची भीतीSaam Tv

गुजरातच्या समुद्रात मोठी दुर्घटना! 13 ते 15 बोटी बुडाल्याची भीती

गुजरातच्या गिर जिल्ह्यामधील सोमनाथमध्ये रात्रीच्या सुमारास मोठी (fishermen missing ) दुर्घटना घडली
Published on

वृत्तसंस्था : गुजरातच्या गिर जिल्ह्यामधील सोमनाथमध्ये रात्रीच्या सुमारास मोठी (fishermen missing ) दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे मच्छिमारांच्या १३ ते १५ बोटी बुडाल्याची भीती आहे. या घटनेमध्ये बोटींवरील ८ ते १० मच्छिमार देखील बेपत्ता झाले आहेत. खराब हवामानामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.

हे देखील पहा-

महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर सतत पाऊस पडत आहे. येत्या ४८ तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याबरोबरच मच्छिमारांना ५ दिवसांचा इशारा जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्रामध्ये चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. गुजरातमध्ये ३० नोव्हेंबरपासून पाऊस सुरू आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत मच्छिमारांना गुजरातच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर धोक्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती अहमदाबादमधील प्रादेशिक हवामान विभागाचे संचालकी मनोरमा मोहंती यांनी सांगितले आहे.

गुजरातच्या समुद्रात मोठी दुर्घटना! 13 ते 15 बोटी बुडाल्याची भीती
'जादूटोण्याने तुझा कोंबडा बनवू', धमकी देत 3 भोंदूबाबानी लाखांना लुटले

हवामान विभागाने १ ते २ डिसेंबर दरम्यान राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. अंदमान- निकोबार मध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com