FIR Against Amit Malviya : भाजप IT सेल प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात FIR; राहुल गांधींना म्हटलं होतं डेंजरस

Political News : राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या ट्वीटवरुन रमेश बाबू यांनी तक्रार दाखल केली होती.
Amit Malviya
Amit MalviyaSaam TV
Published On: 

Karnataka News : भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात बंगळुरुमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या ट्वीटवरुन रमेश बाबू यांनी तक्रार दाखल केली होती.

अमित मालवीय यांनी 17 जून रोजी ट्वीटरवर राहुल गांधी यांचा एक अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना मालवीय यांनी राहुल गांधी यांना धोकादायक म्हटलं होतं. तसेच ते जो खेळ खेळत आहेत तो घातक आहे, असं म्हटलं होतं. आंतरराष्ट्रीय मीडियाचा राहुल गांधी वापर करुन घेत असल्याचा आरोप, अमित मालवीय यांनी केला होता. (Latest Marathi News)

Amit Malviya
Cabinet Meeting Decision : वर्सोवा-वांद्रे सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 28 निर्णय

परदेशात राहुल गांधी यांनी मुस्लीम समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख व्हिडीओत आहे. राहुल गांधींनी परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या संसदेच्या इमारतीबाबत केलल्या वक्तव्यांबद्दलही व्हिडीओत सांगण्यात आलं होतं.

अमित मालवीय यांनी व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर काँग्रेसही आक्रमक झाली होती. देशाची कुणी फसवणूक केली असेल तर ती भाजपची आयटी सेल आहे. अमित मालवीय यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर पाणी फेरलं आहे. मालवीय यांच्याविरोधात तर केंद्र सरकारनेही कारवाई केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली होती. (Political News)

Amit Malviya
Raj Thackeray News : पुण्यातील तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना, प्रशासनाचेही कान टोचले

मालवीय यांच्यावरील कारवाईनंतर कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खरगे यांनी म्हटलं की, भाजपला देशातील कायदे पाळण्यात अडचण आहे. आम्ही त्याचं पालन केलं तरी त्यांना अडचण आहे. मालवीय यांच्यावरील काही दोष असेल तर भाजपने कोर्टात जावं, असंही खरगे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com