Jammu Kashmir Encounter
Jammu Kashmir EncounterSaam Tv

जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीर मधील शोपियानमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक दहशतवादी (terrorist) ठार झाला

वृत्तसंस्था: जम्मू आणि काश्मीर मधील शोपियानमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक दहशतवादी (terrorist) ठार झाला आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा शोपियानच्या तुर्कवांगम भागामध्ये लष्कर (Army) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. यामध्ये एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. (Fighting in Shopian Jammu and Kashmir One terrorist killed)

हे देखील पहा-

तसेच या भागामध्ये आणखी काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशनला (Search operation) सुरुवात झाली आहे. तुर्कवांगम परिसरामध्ये गुरुवारी काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी तत्काळ कारवाई करत शोध मोहीम सुरू केली होती. यानंतर सुरक्षा दलांना दहशतवादी लपलेले ठिकाण सापडले आहे.

त्यानंतर त्यांच्यामध्ये चकमक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात अजून देखील २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची बातमी मिळाली आहे. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर हा सील करण्यात आला आहे.

Jammu Kashmir Encounter
आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; "या" गोष्टी महागणार !

येथील रहदारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अनेक सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com