Fact Check: पाकिस्तानातही लागू होणार CAA, भारतीय मुस्लिमांना मिळणार नागरिकत्व? काय आहे व्हायरल पोस्टचं सत्य?

Pakistan CAA Fact Check News: सीएएवर भारताच्या घोषणेनंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pakistan PM Shehbaz Sharif Social Media Post Viral Post
Pakistan PM Shehbaz Sharif Social Media Post Viral PostSaam Tv
Published On

Pakistan CAA Fact Check News:

भारतात केंद्र सरकारने सोमवारी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केला आहे. या नवीन कायद्यानुसार 2015 नंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक लोकांना नागरिकत्व दिले जाणार आहे.

सीएएवर भारताच्या घोषणेनंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सीएए पाकिस्तानमध्येही लागू केला जाईल. भारतीय मुस्लिमांना नागरिकत्व दिले जाईल. मात्र या व्हायरल पोस्टचे सत्य काय आहे? हेच जाणून घेऊ...  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pakistan PM Shehbaz Sharif Social Media Post Viral Post
PM मोदींनी ऋषी सुनक यांना केला फोन, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टनुसार, शरीफ पाकिस्तानमध्ये नागरिकत्व सुधाणारा कायदा (CAA) जाहीर करणार आहेत. ज्यामध्ये भारतीय मुस्लिम ज्यांना भारतात अत्याचार होत आहे, असं वाटतं, त्यांना पाकिस्तानी नागरिकत्व दिले जाईल. (Latest Marathi News)

शाहबाजच्या नावाने कोणती पोस्ट व्हायरल आहे

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या शेहबाज यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "सीएएनंतर ज्या भारतीय मुस्लिमांना भारतात धोका वाटत आहे, त्यांनी कृपया पाकिस्तानात या. नवाज आणि शेहबाज शरीफ तुमची वाट पाहत आहेत, रोहिंग्या आणि बांगलादेशींना भारत घर नाही. कृपया परत या नाहीतर तुम्हाला भारतातून हाकलून दिले जाईल.''

Pakistan PM Shehbaz Sharif Social Media Post Viral Post
Manohar Lal Khattar: भाजपने अचानक मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून का हटवले? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

काय आहे या पोस्टमागील सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टचा स्क्रीनशॉट फेक असल्याची माहिती समोर आली आहे. शेहबाज शरीफ यांनी सोमवारी 11 मार्च रोजी लागू झालेल्या सीएएबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही. त्याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट 10 मार्च 2023 रोजी केली होती. व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये 11 मार्च ही तारीख दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com