मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीची जय्यत सुरू आहे. मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत 'इंडिया' आघाडीचा नवा लोगो आणि आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
मुंबईतील बैठकीत 'इंडिया' आघाडीत आणखी पक्ष सामील होण्याचं मोठं भाष्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे. दरम्यान, भाजप विरोधात विविध राजकीय पक्षांना एकत्र करण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या नितीश कुमार यांनी मात्र 'इंडिया'च्या आघाडीत सामील होणाऱ्या पक्षांची नावे फोडली नाहीत.
'आम्ही मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करू. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा करू. तसेच आगामी निवडणुकीसाठी अजेंडे निश्चित करण्यात येईल. या आघाडीत आणखी राजकीय पक्ष युतीमध्ये सामील होतील, असेही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
दरम्यान, 'एनडीए'मधील चार घटक पक्ष हे निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांनी केला आहे. अमेठीच्या जागेवर काँग्रेसचा ब्लॉक अध्यक्षही निवडणूक लढला तर स्मृती इराणी यांचं डिपॉझिट जप्त होईल, असंही आलोक शर्मा म्हणाले. नागपुरातील पत्रकार परिषदेत आलोक शर्मा यांनी ही माहिती दिली.
तसेत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील 'इंडिया' आघाडीच्या बैठकविषयी भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, 'मुंबईतील बैठकीत इंडियाच्या लोगोचे अनावरण करण्यात येईल. आमचा १४० कोटी लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. आमच्या 'इंडिया'चा लोगो देश आणि एकतेचे प्रतीक असेल'.
मुंबईतील 'इंडिया'आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहे. तसेच 'इंडिया' आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित राहणार आहे.
मुंबईत ही इंडियाची तिसरी बैठक 'ग्रँड हयात' या अलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. तसेच या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ३१ ऑगस्ट रोजी नेत्यांसाठी रात्रीच्या भोजनाची आयोजन करण्यात आलंं आहे.
मुंबईतील इंडियाची बैठकीसाठी शिवसेना(UBT), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांनी बैठकीचं नियोजन करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. तसेच 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये २०० हून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत, याचं नियोजन ठाकरे गट पाहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.