Manmohan Singh: गावात नव्हती वीज, दिव्याखाली अभ्यास करुन झाले अर्थतज्ज्ञ; मनमोहन सिंग यांचा खडतर जीवन प्रवास

EX PM Manmohan Singh Lifestory: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाला. त्यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांनी दिव्याखाली अभ्यास करुन शिक्षण पूर्ण केले आहे.
Manmohan Singh
Manmohan SinghSaam Tv
Published On

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देशात दुः खाचे वातावरण पसरले आहे. देशात ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मनमोहन सिंग हे १० वर्ष देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत देशासाठी खूप काम केले आहे. मनमोहन सिंग यांनी खूप खडतर परिस्थितीत काम केले आहे. (Manmohan Singh Lifestory)

मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ मध्ये गाह, पूर्वीचे पंजाब आताचे पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांनादेखील फाळणीचा त्रास सहन करावा लागला होता. मनमोहन सिंग हे फाळणीनंतर आपल्या कुटुंबियांसह भापतात आले. मनमोहन सिंग खूप लहान तेव्हाच त्यांच्या आईचे छत्र हरपले. त्यांच्या आजीने त्यांचे संगोपन केले. (Manmohan Singh Story)

Manmohan Singh
Manmohan Singh Death : देशाचा 'अर्थ'कणा हरपला! एम्सनं सांगितलं मनमोहन सिंह यांच्या निधनाचं कारण

मनमोहन सिंग यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांच्या गावात विजदेखील नव्हती. रॉकेलच्या दिव्याखाली ते अभ्यास करायचे. त्यांनी अमृतसरच्या हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून बॅचलर आणि मास्टर डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी. पदवी मिळवली.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक विकासात खूप मोठी भूमिका बजावली. त्यांनी नियोजन आयोग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर,आर्थिक सल्लागार अशा अनेक पदांवर काम केले आहे. त्यांनी १९६६ ते १९६९ या काळात UNCATAD या व्यापार आणि विकासासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र परिषदेसाठी काम केले. त्यांनी विदेश व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून काम पाहिले. पुढे १९७२ मध्ये अर्थ मंत्रालयात ते मुख्य सल्लागार होते.

Manmohan Singh
Manmohan Singh: पाकिस्तानात जन्म, रिझर्व्ह बँकेत नोकरी ते २ वेळा पंतप्रधान, मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास

१९७६ मध्ये ते अर्थमंत्रालयात सचिव होते. १९८२ रोजी ते आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांची १९९१ मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली. मनमोहन सिंग हे १९९१ मध्ये राज्यसभेवर निवडून आले. ते सलग पाच वेळा निवडून आले. २२ मे २००४ रोजी ते देशाचे पंतप्रधान झाले. १९८७ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांना सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून नाव दिले. याचसोबत उत्कृष्ट संसदीय पुरस्कारदेखील दिला होता.

Manmohan Singh
Manmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com