Pakistan Election 2024: पाकिस्तानात 10 दिवस उलटूनही नवे सरकार स्थापन झाले नाही, नेमकं काय आहे कारण?

Pakistan News: पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 10 दिवस उलटूनही नवे सरकार स्थापन झाले नाही.
Pakistan Election 2024
Pakistan Election 2024Saam Tv
Published On

Pakistan Election 2024:

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

शेहबाज शरीफ पंतप्रधान आणि आसिफ अली झरदारी राष्ट्रपती होतील यावर दोघांमध्ये एकमत झाले होते, असं वृत्त होतं. मात्र अद्याप शपथविधी झालेला नाही. आता पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यात 19 फेब्रुवारीला चर्चेची पुढील फेरी होणार असून, त्यात सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pakistan Election 2024
Safe Family Car: फॅमिली सेफ्टीसाठी बेस्ट आहेत TATA च्या कार, मिळाली 5-स्टार रेटिंग; पाहा Crash Test VIDEO

द ट्रिब्यून एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 17 फेब्रुवारी रोजी पीएमएल-एन आणि पीपीपीच्या समन्वय समित्यांमध्ये सरकार स्थापनेशी संबंधित प्रमुख प्रस्तावांवर चर्चा झाली. बैठकीत दोन्ही बाजूंनी सरकारच्या स्थापनेवर भर दिला. पीएमएल-एन पक्षाकडून सिनेटर इशाक दार, सरदार अयाज सादिक, सिनेटर आझम नझीर तरार आणि मलिक मुहम्मद अहमद खान या बैठकीला उपस्थित होते. (Latest Marathi News)

पीटीआयने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या

दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत पीटीआय समर्थित उमेदवारांनी 92 जागा जिंकल्या, तर पीएमएल-एन 80 आणि पीपीपीने 54 जागा जिंकल्या. यानंतर पीएमएल-एन आणि पीपीपीने आघाडी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली.

Pakistan Election 2024
Jalgaon News : दार उघडताच दिसला बहिणीचा मृतदेह; मुलीने संपविली जीवनयात्रा

अद्यापही सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय झाला नाही

पीपीपी आणि पीएमएल-एन यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मात्र सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दोन्ही पक्षांनी युतीसाठी चर्चा करण्यासाठी आणि शिफारशींची औपचारिकता करण्यासाठी संपर्क आणि समन्वय समिती (CCC) स्थापन केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com