Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam Tv

राहुल गांधींची ईडीने केली सलग १० तास चौकशी; तिसऱ्या दिवशीही ईडीने बोलावले

मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.
Published on

नवी दिल्ली : मनी डॉड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस (Congres) राहुल गांधी यांची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. आज सलग १० तास राहुल गांधी यांची चौकशी केली. उद्याही गांधी यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. कालही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशी विरोधात काँग्रेसने काल आंदोलन केले.

ईडीच्या समन्सला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे (Congres) प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह १०० हून अधिक नेत्यांना पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी काँग्रेस कार्यालय आणि ईडी मुख्यालयाभोवती कलम १४४ लागू केले आहे. सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

Rahul Gandhi
राज्यात उद्यापासून शाळा सुरू होणार; वर्षा गायकवाड म्हणाल्या...

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) विरोधात ईडीची चौकशी हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, कारण राहुल गांधी यांनी महागाई, इंधनाच्या किमती, बेरोजगारी, धार्मिक सूड यासारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारला नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे त्यांची ईडी चौकशी करत आहेत, असा आरोपही रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला.

Rahul Gandhi
...म्हणून भाजपने अजितदादांना बोलू दिले नाही; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

भाजप (BJP) मीडिया आणि व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचा वापर करत आहे. पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींचे एजंट बनून त्यांना परदेशात कंत्राट मिळवून देत असल्याचा आरोपही सुरजेवाल यांनी केला. राहुल गांधी बघून सरकारला सवाल करतात, असंही सुरजेवाल म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com