Jharkhand Encounter News: झारखंडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

Encounter Between Naxals & Security-Forces: झारखंडच्या सीमा सुरक्षा दलाने पलामू-चतरा सीमेवर नक्षलविरोधी अभियान सुरु केले आहे. या अभियानादरम्यान चकमक झाली.
Jharkhand Encounter
Jharkhand EncounterSaam Tv
Published On: 

Jharkhand Encounter News: झारखंडमध्ये सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक (Jharkhand Encounter) झाली आहे. झारखंडच्या चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेजवळ ही चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना (Jharkhand Police) यश आल्याची माहिती समोर आली आहे.

Jharkhand Encounter
Maruti Suzuki Discontinued Alto 800 Production : Maruti Suzuki च्या ग्राहकांना दणका! कंपनीने केले Maruti Alto 800 चे उत्पादन बंद

झारखंडच्या सीमा सुरक्षा दलाने पलामू-चतरा सीमेवर नक्षलविरोधी अभियान सुरु केले आहे. या अभियानामध्ये सीआरपीएफ कोब्रा बटालियन, जेएपी, आयआरबी यांच्यासह पलामू आणि चत्राच्या जिल्हा सुरक्षा दलाचा समावेश आहे. या अभियानादरम्यान सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

Jharkhand Encounter
Kerala Train Fire News: क्षुल्लक कारणावरुन धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला जाळलं; लहानग्यासह तिघांचा मृत्यू

चतरा पोलिसांनी या चकमकीमध्ये असलेला स्पेशल एरिया कमिटीचा कमांडर गौतम पासवान, अजीत उरांव उर्फ चार्लिस, अमर गंझू, नंदू आणि संजीत भुइया यांना ठार केले. चकमकीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गौतम पासवान याच्यावर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तर अमर गंझूवर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या पाच नक्षलवाद्यांपैकी एक नक्षलवादी बिहारचा तर इतर नक्षलवादी हे झारखंडचे राहणारे होते. नक्षलवाद्यांच्या इतर साथीदारांचा शोधण्यासाठी जंगलात पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन एके ४७ सह मोठा शस्त्रसाठा जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.