Twitter: निळ्या चिमणीसाठी 34 हजार 375 डॉलरची बोली; ट्विटरवरील चिमणीचा नवा मालक कोण?

Twitter Logo: ट्विटरवरील निळ्या रंगाची चिमणीला नवा मालक मिळालाय. ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलॉन मस्कने निळ्या चिमणीला हटवून त्या जागी एक्सवर ठेवण्यात आलं.
Twitter
Twitter LogoSaamtv
Published On

अनेकजण ट्विटरला ब्लू बर्ड या नावाने ओळखलं जातं. निळ्या रंगाची चिमणी पाहिली तरी ट्विटर आपल्या डोक्यात येतं. पण जेव्हापासून एलॉन मस्क यांनी हे ट्विटरची खरेदी केली तेव्हापासून त्यांनी यात अनेक मोठे बदल केलेत. ट्विटरचे नाव आणि लोगोही मस्क यांनी बदलला. ट्विटर आता X नावाने ओळखलं जातं. आधीच्या ट्विटरवर चिमणीचा लोगो होता. या निळ्या रंगाच्या चिमणीचा लिलाव झालाय. अमेरिकेच्या सॅन फ्रॉन्सिकोच्या मुख्यालयात आयकॉनिक लोगोचा लिलाव करण्यात आला.

किती रुपयांचा सौदा झाला?

लिलाव करणाऱ्या कंपनीच्या पीआरनुसार,निळ्या रंगाच्या चिमणीचा 34 हजार 375 डॉलर्स (सुमारे 30 लाख रुपये) लिलाव झालाय. या पक्ष्याच्या आयकॉनचं वजन सुमारे 254 किलो आहे. हे 12 फूट उंच, 9 फूट रुंद आयकॉन आहे. सध्या हा पक्षी खरेदी करणाऱ्याची ओळख उघड झालेली नाहीये.

Twitter
March Endला नोकरी बदलली? मग ITR भरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर..

ब्लू बर्डच्या लिलावाशिवाय, Apple-1 (संगणक) कॉम्प्युटरचा लिलाव सुमारे 3.22 कोटी रुपयांना ($3.75 लाख), स्टील जॉब्सने स्वाक्षरी केलेला ऍपलच्या चेकला सुमारे 96.3 लाख रुपयांना ($1,12,054) लिलाव झाला होता. पहिल्या जेनरेशन सील्ड पॅक 4GB आयफोनचा 87 हजार 514 डॉलरमध्ये विक्री झाली होती. ब्लू बर्ड लोगो यापुढे मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट X चा भाग नसणार आहे. पण Apple किंवा Nike प्रमाणे सोशल मीडियामध्ये ट्विटरची ओळख निळ्या पक्ष्याने होत होती.

Twitter
Sunita Williams Return : सुनीता विलियम्स अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार, नासाची तयारी पूर्ण, केव्हा होणार लँडिंग?

एलॉन मस्कने ट्विटर 2022 मध्ये खरेदी केलं होतं. ट्विटर सुमारे 3368 अब्ज रुपयांना ($44 अब्ज) विकत घेतले. हा करार झाला तेव्हा एलॉन मस्क म्हणाले होते की, लोकशाही टिकवण्यासाठी भाषण स्वातंत्र्य आवश्यक आहे. मस्कची इच्छा होती की, Twitter नवीन वैशिष्ट्ये आणि सुधारणांसह सर्वोत्तम बनवण्याचं. यासाठी त्यांनी या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com