Pakistan
PakistanSaam TV

Breaking: इम्रान खान यांची मागणी मान्य; पाकिस्तानात 90 दिवसांत निवडणूका

इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर संसद आणि प्रांतीय विधानसभा देखील बरखास्त करण्यात आल्या आहेत.
Published on

लाहोर: पाकिस्तानमधील मध्यावधी निवडणुकांसाठी आपण सज्ज असून आता पाकिस्तानची संसद बरखास्त करा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी केली आणि लगेचंच पाकिस्तानच्या (Pakistan) राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली आहे.

इम्रान खान (Imran Khan) यांच्या पंतप्रधान पदाचा फैसला आज होणार होता याबाबतच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना विराधकांचा अविश्वास ठराव पाकिस्तान संसदेनं (Parliament of Pakistan) फेटाळत तो घटनाबाह्य असल्याचं घोषित करत संसदेच कामकाज २५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता.

हे देखील पहा -

दरम्यान, संसदेच्या कामकाजानंतर बोलताना विरोधकांचा अविश्वास ठराव म्हणजे परकीय शक्तीचं षडयंत्र असून आहे. पाकिस्तानी (Pakistan) जनतेनं आता निवडणुकांसाठी तयार रहावं असं सांगितलं असतानाच आता संसद बरखास्त केली असून प्रांतिय विधानसभा देखील बरखास्त करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. संसद बरखास्त केल्याने आता ९० दिवसांमध्ये निवडणुका लागणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com