lok Sabha Election : PM मोदींसह आता राहुल गांधींनाही निवडणूक आयोगाची नोटीस, उत्तरे द्यावी लागणार!

lok Sabha Election latest Update : आता केंद्रीय निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाला उत्तरे द्यावी लागणार आहेत.
lok Sabha Election : PM मोदींसह आता राहुल गांधींनाही निवडणूक आयोगाची नोटीस, उत्तरे द्यावी लागणार!
Rahul Gandhi NewsSAAM TV

नवी दिल्ली : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली होती. त्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली. तर काँग्रेसने मोदींच्या टीकेतील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर भाजपनेही राहुल गांधी यांच्या विरोधात आयोगाकडे तक्रार नोंदवली. या सर्व राजकीय घडामोडींवरून आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाला उत्तरे द्यावी लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समुदायाचा उल्लेख करत केलेल्या टिप्पणीवर काँग्रेस केंद्रीय आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर आयोगाने भाजपला नोटीस धाडली. त्यामुळे आता भाजपला २९ एप्रिलला ११ सकाळी वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

तर नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी यांच्या एका विधानावरून आयोगाने काँग्रेसला नोटीस धाडली आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर द्यावे लागणार आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार केली. तर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने तक्रार केली होती.

lok Sabha Election : PM मोदींसह आता राहुल गांधींनाही निवडणूक आयोगाची नोटीस, उत्तरे द्यावी लागणार!
Rahul Gandhi-Priyanka Gandhi: अमेठीतून पुन्हा राहुल गांधी तर रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार? काँग्रेसचा मास्टर प्लान

निवडणूक आयोगाने लोक प्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत ७७ कलमांतर्गत स्टार प्रचारकांच्या पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस धाडल्या आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षांच्या अध्यक्षांना आयोगाच्या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. तसेच पक्षांच्या अध्यक्षांना पाठवलेल्या नोटीसमध्ये नेत्यांनी वक्तव्य जबाबदारीने करावे, असं नमूद केलं आहे.

lok Sabha Election : PM मोदींसह आता राहुल गांधींनाही निवडणूक आयोगाची नोटीस, उत्तरे द्यावी लागणार!
Madha Constituency : मोठा हुंडा मागितल्यानं लग्न मोडलं; फडणवीसांच्या भेटीवरून शहाजी बापूंचा जानकरांना चिमटा

तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात एका समुदायाचा उल्लेख करत वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांचा एका विधानाचा दाखला देत आयोगात तक्रार दिली. त्यामुळे आयोगाकडून दोन्ही नेत्यांना संयम राखून भाषणे करण्यास सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com