Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, EVM मतमोजणीचा नियमच बदलला

Vote Counting Rule Changes: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनेक बदल केलेत. यासंदर्भात मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल.
Vote Counting Rule Changes
Election Commission announces major change: Postal ballots to be counted before EVMs in upcoming Bihar elections.saamtv
Published On
Summary
  • निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल केलाय.

  • गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने तब्बल ३० मोठे बदल केलेत.

  • आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल आणि त्यानंतरच ईव्हीएम मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाकडून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनेक बदल केले जात आहेत. आताच्या काळात आयोग जनता आणि राजकारण्यांचे हित लक्षात घेऊन अनेक निर्णय घेत आहे. बिहार विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये येत आहेत, त्याआधी मोठे बदल केली जात आहेत. गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने ३० मोठे बदल केलेत. यातील यादीबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय.

पोस्टल मतपत्रिका मोजल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार नाही. मतमोजणी प्रक्रिया सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलण्यात आलंय. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम आता उघडता येणार नाहीत. असा आदेश निवडणूक आयोगाने आपल्या नव्या नियमातून दिलाय. आतापर्यंत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली नसली तरी EVM उघडून त्याच्या मोजणीला सकाळी ८:३० वाजता सुरूवात केली जात असत.

Vote Counting Rule Changes
Aadhaar Card: सुप्रीम कोर्टाचा नागरिकांना 'आधार'; नागरिकत्वासाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

पण आता यातपूर्णपणे बदल करण्यात येणार आहे. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच EVM उघडल्या जाणार आहेत. जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जास्त पोस्टल मतपत्रिका असतील तर त्यांच्यासाठी अधिक टेबले लावली जातील. जर काही समस्या उद्भवल्या तर त्याची जबाबदारी तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांची असे, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जर अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर ते केले जाईल, जेणेकरून निकाल देण्यात उशीर होणार नाही. आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. निकाल प्राप्त झाल्यानंतर, ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होणार आहे.

Vote Counting Rule Changes
Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

पोस्टल बॅलेटद्वारे कोण मतदान करते?

मतदानाविषयी जनजागृती वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटद सुरू केल्या. नोकरीमुळे जे मतदार स्वतःच्या मतदारसंघात मतदान करू न शकत नाहीत ते या द्वारे मतदान करतात. यासह ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, अपंग मतदार पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात. परंतु यासाठी आधी नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यांचे मतदान सर्वसामान्यांच्या मतदानाच्या काही दिवस आधी पूर्ण होते. जेव्हा जेव्हा निवडणुकीमध्ये मतमोजणी सुरू होते तेव्हा प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातात. त्यानंतर, ईव्हीएममध्ये नोंदवलेली मते मोजली जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com