रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार; शिंदेंच्या शहा आणि तटकरेंसोबत बैठका, पडद्यामागं नेमकं काय घडलं?

Raigad Guardian Minister: एकनाथ शिंदे व सुनील तटकरे यांची दिल्लीत भेट झाली. या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रिपदावर ठोस चर्चा झाली. १५ ऑगस्टपूर्वी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Shinde Meets Amit Shah
Shinde Meets Amit ShahSaam TV News
Published On
Summary
  • एकनाथ शिंदे व सुनील तटकरे यांची दिल्लीत भेट झाली.

  • या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रिपदावर ठोस चर्चा झाली.

  • १५ ऑगस्टपूर्वी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीतील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची दिल्लीतच भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

रायगड पालकमंत्रिपदाच्या तिढाबाबतचा मुद्दा एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांच्यासमोर मांडला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना एकत्र बसून प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनंतर एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्या दिल्लीतच बैठक झाली. दरम्यान, या बैठकीनंतर १५ ऑगस्टआधी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाकडे की राष्ट्रवादी अजित पवारांकडे जाणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Shinde Meets Amit Shah
बीडमध्ये राजकीय भूकंप! मुंडेंचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी अजित दादांसोबत जाण्यामागचं सांगितलं कारण

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात शीतयुद्ध सुरूये. गेल्या ६ महिन्यांपासून रायगडचा पालकमंत्रिपदाबाबतचा प्रश्न अद्याप कायम आहे. मात्र, या वादाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेते पंडित पाटील यांनी या वादावर तोडगा देत पालकमंत्रिपद भाजपकडे सोपवावं, अशी थेट मागणी केलीये. तटकरे आणि गोगावले यांच्यात शीतयुद्ध सुरू असतानाच भाजप नेत्यानं यात उडी घेतल्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा काही सुटेना

१८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंचं नाव जाहीर करण्यात आलं. तर, नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि नाशिकमधून दादा भूसे इच्छुक होते. त्यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आतापर्यंत पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटलेला नाही.

Shinde Meets Amit Shah
लाडकींच्या खात्यात २४ तासात खटाखट १५०० रूपये जमा होणार; मंत्री आदिती तटकरेंची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com