Maharashtra Politics : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा; अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं?

maharastra Politics : महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम आहे.
मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा; अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं?
Maharashtra Politics Saam tv
Published On

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता साऱ्यांचे लक्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपाकडे लागलं आहे. कोणाच्या पदरत कोणती मंत्रिपदे मिळतात, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपदांच्या वाटपासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आधीच पोहोचले होते. तर एकनाथ शिंदे हे त्यांच्यानंतर पोहोचले. या बैठकीत काय ठरलं, याची माहिती महायुतीचे नेते शुक्रवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा दिल्लीत पोहोचला. महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते गुरुवारी सांयकाळी दिल्लीला रवाना झाले. सुरुवातीला अजित पवार हे त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत दिल्लीला पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली गाठली. दिल्लीत पोहोचल्यानंतपर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. दुसरीकडे एकनाथ शिंदे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले.

मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा; अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं?
Eknath Shinde PC: नाराज होऊन रडणारे नाही.. लढणारे! एकनाथ शिंदेंनी काय काय सांगितलं?

एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातही बैठक झाली. यावेळी अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु होती. काही वेळानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमित शहा यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरु झाली.

मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा; अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं?
Devendra Fadnavis : फडणवीस याआधीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते; भुजबळांना नेमकं काय म्हणायचंय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी महायुतीची तब्बल दीड तास बैठक चालली. दीड तासानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, एकनाथ शिंदे बैठकीतून बाहेर निघाले. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा; अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं?
Ajit Pawar PC News : अजित पवारांना दिल्लीचे वेध? केलं मोठं विधान

महायुतीत शिंदे गटाने त्यांचा विधीमंडळ पक्षाचा गटनेता निवडला आहे. तर अजित पवार गटानेही त्यांचा विधीमंडळ पक्षाचा गटनेता निवडला आहे. त्यानंतर आता भाजपला विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करणे बाकी आहे. यासाठी भाजपसाठी पाऊले उचलल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे निरीक्षक लवकरच मुंबईत जाणार आहे. यासाठी भाजपकडून तीन निरीक्षकांची घोषणा केली जाणार आहे. निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com