Ajit Pawar PC News : अजित पवारांना दिल्लीचे वेध? केलं मोठं विधान

Rashtrawadi Congress Delhi : दिल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर यावेळी महाविकास आघाडीवर देखील त्यांनी टीका केली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaamTv
Published On

आगामी काळात आपल्याला आणखी काम करायचं आहे. डिसेंबरनंतर आपण दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन घेऊ, पुढे कस जायचं त्यावर त्यात मंथन करू. यंग जनरेशनला आपणं पुढे आणणार आहोत. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो पूर्ण करायचा आहे. लवकरात लवकर आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष बनेल असा विश्वास व्यक्त करतो, असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजधानी दिल्ली येथील कार्यालयात आज (गुरुवार दि.28) अजित पवार यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. महायुतीच्या बैठकीपूर्वी घेतलेल्या या पत्रकार परिषदेतून अजित पवार यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्याचेही संकेत दिले आहेत.

Ajit Pawar
MLA Uday Samant : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नाही; सामंत यांचं खळबळजनक स्पष्टीकरण

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांनी जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1962 मध्ये 222 आमदार निवडून आले होते. त्यानंतर या विधानसभेत सर्वाधिक यश मिळालं आहे. महिलांनी देखील मोठ्या संख्येने मतदान केलं असून त्यांच्यामुळे यश मिळालं आहे.

आता जबाबदारी देखील वाढली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलताना आम्ही ठरवले आहे की, अजून जोमाने काम करावं लागणार आहे, असं म्हणत डिसेंबरनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार असून यात जबाबदारीचे वाटप केलं जाणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. यात महिला आणि तरुण पिढीला संधी दिली जाणार आहे.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : फडणवीस याआधीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते; भुजबळांना नेमकं काय म्हणायचंय?

दरम्यान, महायुतीच्या बैठकीबद्दल बोलताना पुढील मंत्रिमंडळ कसं असेल यावर गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बसून आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढील मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल.

ईव्हीएम मशीनला दोष देण्यात तथ्य नाही

महाविकास आघाडीकडून पराभवासाठी ईव्हीएम मशीनला दोष दिला जात आहे. त्यावर देखील अजित पवार यांनी यावेळी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ईव्हीएम मशीनवर काही लोक दोष देत आहेत, मात्र त्यात काही तथ्य नाही. लोकसभा निवडणुकीत आपल्याला फारसं यश आलं नाही. मात्र खचून न जाता आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी काम केलं. ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काही अर्थ नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. विरोधकांचं इतर काही राज्यात सरकार स्थापन झालं आहे. तेव्हा त्यांनी ईव्हीएमला दोष दिला नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

Edited By Rakhi Rajput

Ajit Pawar
Sajay Raut: तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, दिल्लीतील बैठकीवर संजय राऊत संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com