Sajay Raut: तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, दिल्लीतील बैठकीवर संजय राऊत संतापले

Maharashtra Politics: मुखमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असून एकनाथ शिंदे यांनी हक्क सोडला आहे. मात्र बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री ठरत नसण्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv
Published On

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये महायुतीला बहुमत मिळालंय. मात्र मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न अजूनही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. दरम्यान मुखमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असून एकनाथ शिंदे यांनी हक्क सोडला आहे. मात्र बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री ठरत नसण्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

Sanjay Raut
Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? सीएमपदाच्या बदल्यात मुलगा डीसीएम?

काय म्हणाले संजय राऊत?

राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे अजून ठरत नाहीये. निवडणूकीच्या निकालामध्ये 200 पेक्षा जास्त जागा येऊन देखील महायुतीचा पण मुख्यमंत्री ठरत नाहीये. भाजपला पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्री पद का लटकून पडलंय हे जनतेला समजत नाहीये, असं संजय राऊत म्हणालेत.

Sanjay Raut
Maharashtra Politics: ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार? विधानसभेला मुंबईत महायुतीचा डंका

'बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'

पत्रकार परिषदेवेळी संजय राऊत म्हणाले की, आम्ही आजही मानत नाही की हा जनतेचा कौल आहे. मुळात राज्यात नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा कसा असू शकतो हेच मला समजत नाहीये. शिवसेना स्वतःला समजणाऱ्यांनी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकार नाहीत. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की, राज्य कोणाच्या हाती द्यायचं आहे.

Sanjay Raut
Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार की भाजप धक्कातंत्र वापरणार? दिल्लीत ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री!

महाविकास आघाडी फुटणार नाही- राऊत

महाविकास आघाडीतून ठाकरे गट वेगळा होणार असा चर्चा रंगल्या होत्या. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविआघाडी अजिबात फुटणार नाही. आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. जसं की, लोकसभेला एकत्र लढलो त्याचा फायदा आम्हाला झाला. विधानसभेला का फायदा झाला नाही हे एकत्र बसून ठरवणार आहे. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ.

Sanjay Raut
CM DCM Video Viral News | Eknath Shinde Devendra Fadanvis Ajit Pawar यांचा व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. त्यामुळे आता जो मुख्यमंत्री होईल त्यांचं आम्हाला स्वागत करावं लागेल. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीच ठरवणार आहे, असंही राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com