
Eknath Shinde Press Conference: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. महायुतीने २३० जांगावर बाजी मारली. तर शिवसेना शिंदे गटाने ५७ जागा जिंकल्या. या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान काळजीवाहू मुंख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
गेली अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहिला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. यासह, आम्ही रडणारे नाही, तर लढणारे आहोत.असं म्हटलंय.
पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'आम्ही नाराज होऊन रडणारे नाहीत. आम्ही लढून काम करणारे आहोत. हे सरकार लोकांमध्ये जाणारे सरकार आहे. आम्ही मनापासून काम केलं.माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी काम करेन.'
'अडीच वर्षांच्या काळात राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे, त्याचं कारण समविचारी सरकार आहे. राज्यात आणि केंद्रात त्यावेळी प्रगतीचा वेग अतिशय गतिमान होतो. हे सगळं अडीच वर्षांच्या कारकीर्दीत घडलं, मी खूप समाधानी आहे. मी काय डिटेल्समध्ये जाणार नाही. या काळात आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने जे काही निर्णय घेतले, ते यापूर्वी कुठल्याही सरकारने घेतले नव्हते.' असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, 'आपण जे काही पाहतोय की, राज्याच्या प्रगतीचा वेग प्रचंड वाढला. राज्य एक नंबरला नेण्याचे काम आम्ही केले आहे. महायुतीचं सरकार होतं तेव्हाही पुढे होतं. मागच्या अडीच वर्षांतही पुन्हा पहिल्या नंबरला राज्य आणलं. या राज्यात जे अडीच वर्षांत काम केलं त्यामुळे या निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला. लाडकी बहीणीचा सख्खा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झाली. सावत्र भावांना लक्षात ठेवा असं सांगितलं होतं आणि पूर्णपणे त्यांनी लक्षात ठेवलं. लाडका भाऊ ही ओळख सर्व पदांपेक्षा मोठी वाटते. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की,मी समाधानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.