ED Raid on AAP Sanjay Singh : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीची छापेमारी; काय आहे प्रकरण?

Sanjay Singh ED raid Update : दारू घोटाळा प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आप खासदार संजय सिंह यांचे नाव होते.
ED Raid on AAP Sanjay Singh : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीची छापेमारी; काय आहे प्रकरण?
Published On: 

Delhi News :

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) बुधवारी पहाटे छापा टाकला आहे. ईडीचे पथक त्यांच्या घराची सध्या झडती घेत आहे.

दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणी खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानावर ही छापेमारी करण्यात आली आहे.

दारू घोटाळा प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आप खासदार संजय सिंह यांचे नाव होते. संजय सिंह यांच्या जवळच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

ED Raid on AAP Sanjay Singh : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीची छापेमारी; काय आहे प्रकरण?
Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोण मारणार? १० ऑक्टोबरपर्यंत BMC घेणार निर्णय

गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात आप सरकारमध्ये मंत्री असलेले सत्येंद्र जैन यांना अटक केली होती. सध्या आजारपणामुळे त्यांना कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला आहे. (Political News)

ED Raid on AAP Sanjay Singh : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीची छापेमारी; काय आहे प्रकरण?
Maharashtra Politics: पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार, दिल्लीतून आली गुड न्यूज; अमित शहांसोबत काय चर्चा झाली?

दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया देखील तुरुंगात आहेत. दिल्ली सरकारने 2021 पासून दिल्लीत नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या नव्या मद्य धोरणांतर्गत दारूचा व्यवसाय पूर्णपणे खासगी हातात गेला. त्यामुळे दिल्ली सरकार यातून पूर्णपणे बाहेर पडले.

या नव्या धोरणामुळे माफिया राजवट संपुष्टात येईल, असा युक्तिवाद दिल्ली सरकारने त्यावेळी केला होता. यामुळे सरकारच्या महसुलातही वाढ होईल, असा दावाही करण्यात आला. मात्र त्याचे परिणाम पूर्णपणे उलट झाले आणि सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.