Ebola Virus Alert : इबोला व्हायरसचा धोका, भारतात अलर्ट; ताप आल्यानंतर टेस्ट, हाय रिस्क देशांतून आलेल्या प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी

India issues ebola virus advisory for international travellers : भारत सरकारनं इबोला व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. ताप किंवा अन्य लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवाशांना विमानतळावरील मदत कक्षाला तातडीने माहिती द्यायची आहे. तसेच भारतात आल्यानंतर २१ दिवस प्रकृतीकडे बारकाईने लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Ebola Alert : इबोला व्हायरसचा धोका, भारतात अलर्ट
Ebola virus alert in IndiaSAAM TV
Published On

भारताच्या आरोग्य सेवा संचालनालयाने (DGHS) इबोला व्हायरसचा धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे. इबोला व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशांतून (हाय रिस्क) आलेल्या प्रवाशांसाठी ही अॅडव्हायझरी जारी केली आहे. या प्रवाशांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा आणि दक्षिण सूदान या देशांचा हाय रिस्क देशांच्या श्रेणीत समावेश केला आहे. या देशांतून आलेल्या प्रवाशांना आपल्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली विमानतळावर एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन (APHO) या विभागाकडून याबाबत विशेष माहितीचे फलक लावण्यात आले आहेत.

इबोला व्हायरसची लक्षणे

प्रवाशांना ताप, थकवा, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे यांसारख्या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. याशिवाय उलटी, घशात खवखवणे, रक्तस्त्राव अशी इबोलाची लक्षणे असू शकतात. एखाद्या प्रवाशामध्ये अशी लक्षणे दिसून आल्यास संबंधितांनी तातडीने विमानतळ अधिकाऱ्यांना ही माहिती द्यायची आहे.

आरोग्य संचालनालयाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीनुसार, एखादा प्रवासी संशयित किंवा इबोला व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला तर, त्यांनी तातडीने विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. भारतात आल्यानंतर २१ दिवसांच्या आत त्यांनी आरोग्यविषयक मदत घ्यावी.

प्रवाशांसाठी विशेष सल्ला

आरोग्य संचालनालयाने हाय रिस्क देशांतून आलेल्या प्रवाशांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. भारतात आल्यानंतर २१ दिवसांच्या आत इबोला व्हायरसची लक्षणे दिसून आल्यास संबंधित प्रवाशांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांनी आपल्या प्रवासाचा मागील इतिहास (ट्रॅव्हल हिस्ट्री) डॉक्टरांना सांगावा. आरोग्य सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी विमानतळावर होणाऱ्या आरोग्य तपासणीला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्य संचालनालयाने केले आहे.

आरोग्य मंत्रालय म्हणाले, घाबरू नका!

यापूर्वीही अशा परिस्थितीचा सामना करण्याचा अनुभव गाठिशी आहे. २०१४ मध्ये आफ्रिकेत इबोला व्हायरसचा उद्रेक झाला होता. त्यावेळी खबरदारीच्या सर्व उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची काहीही गरज नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

जगात ६६८ रुग्णांची नोंद

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कांगो आणि युगांडामध्ये इबोलाचा प्रादूर्भाव झाला आहे. १८ मेपर्यंतच्या नोंदीनुसार, ५२८ संशयित रुग्ण आढळले असून, १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ६६८ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५४१ रुग्ण कांगोमध्ये, तर युगांडामध्ये १२७ रुग्णांची नोंद झाली आहे.

Ebola Alert : इबोला व्हायरसचा धोका, भारतात अलर्ट
Health Tips: जेवल्यानंतर लगेच पाणी पिता का? उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com