Earthquake: उत्तराखंडमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
Earthquake: उत्तराखंडमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्केSaam Tv

Earthquake: उत्तराखंडमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 आहे.
Published on

उत्तराखंड : उत्तराखंडची Uttarakhand राजधानी देहरादूनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 आहे. मात्र, यामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू देहरादून असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाचे Earthquake धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले.

उत्तराखंड भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील राज्य आहे. 24 जुलै रोजी उशिरा उत्तरकाशी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही.

भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर लोक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी गेले. सुमारे 10 ते 15 मिनिटांनंतर लोक पुन्हा त्यांच्या घरी परतले आहेत. उत्तराखंड भूकंपासाठी अत्यंत संवेदनशील आहे. भूतकाळातील भूकंपामुळेही राज्यात कहर केला होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com