Earthquake : दिल्ली-NCR पासून लाहोरपर्यंत हादरे; भूकंपाचे जोरदार धक्के, केंद्रबिंदू मात्र दुसऱ्याच देशात...

भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तानमध्येही भूकंपाने धरती हादरली.
Earthquake
EarthquakeSaam Tv
Published On

Earthquake Tremors Delhi- NCR : दिल्ली-एनसीआर गुरुवारी संध्याकाळी उशिरा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. साधारण ७ वाजून ५७ मिनिटांनी या ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीरलाही झटके बसले. भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तानमध्येही भूकंपाने धरती हादरली.

भूकंपाने भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान आदी देशांतील काही भागही हादरले. या ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. गुरुवारी संध्याकाळी उशिरा हादरे जाणवू लागले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.५ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता.

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता ५.९ इतकी नोंदवली

अफगाणिस्तानही भूकंपाने हादरला. या ठिकाणी भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.९ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू हा फैजाबादपासून ७९ किलोमीटरवर दक्षिणेत होता.

१ जानेवारीला लडाखमध्येही भूकंपाचे धक्के

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लडाखच्या कारगिलमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवली गेली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १५० किलोमीटर खोलवर होता. शनिवारी मध्यरात्री साधारण १ वाजून १९ मिनिटांनी भूकंपाने धरती हादरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com