पंपावरूनच अधिकृत पेट्रोल घेतलं....कंपनीनंही गाडी इथेनॉलमिश्रित इंधनासाठी सक्षम असल्याचा दावा करून ग्राहकाच्या माथी मारली....मात्र काही दिवसांतच इंजिननं काम काढलं. गॅरेजच्या फेऱ्या सुरू झाल्या आणि अखेर प्रकरण कोर्टात गेलं... छत्तीसगडमधील ग्राहक न्यायालयानं थेट आदेश दिलाय "एकतर ग्राहकाला नवीन E20 सुसंगत गाडी द्या, नाहीतर ग्राहकाचे 20 लाख रुपये व्याजासह परत करा.." हा निर्णय फक्त एका ग्राहकापुरता मर्यादित नाही, तर सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाला तोंड फोडणारा ठरलाय... महाराष्ट्रातील गॅरेजमध्ये येणाऱ्या 10 पैकी 4 गाड्या इथेनॉलमिश्रित इंधनामुळे बिघडत असल्य़ाचा दावा मेकॅनिक करतायत... त्यासाठी साम टिव्हीनं रिअॅलिटी चेक केला....
छत्रपती संभाजीनगरमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये नेमका कसा बिघाड होतोय... पाहा... नाशिकमध्येही पेट्रोलमध्ये जास्त प्रमाणात इथेनॉल असल्यामुळे वॉल्व्ह, पिस्टन आणि कार्बोरेटरवर चिकट थर साचून गाड्या वारंवार बंद पडत असल्य़ाचा दावा मॅकेनिकनं केलाय...कोल्हापूरातही इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनमध्ये विविध प्रकारचे बिघाड वाढताना दिसतायत... मात्र नागपूरातील एका ऑटोमोबाईल तज्ज्ञानं गाडीत बिघाड होण्यामागे इथेनॉल जबाबदार असल्याचा ठोस पुरावा नसल्याचं सांगितलयं....महाराष्ट्रात ठिकठिकाणी साम टिव्हीनं मॅकेनिक आणि ऑटोमोबाईल इंजिनियरला भेट घेऊन इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळू वाहनात काय अडचणी येतात याबाबत माहिती मिळवली....त्यावेळी काय समोर आलं? पाहूयात...
- E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण जास्त असल्यानं ब्लॉक पिस्टन, वॉल्व्हवर इथेनॉलचा चिकट थर साचून ते जॅम होते
- गाडी बंद पडणे, पीक अपला अडचण आणि एव्हरेज कमी होते, बऱ्याचदा पार्ट बदलावे लागतात
- पाऊस नसल्यास एका दिवसाला एका गॅरेजमध्ये सरासरी 3 ते 4 गाड्या दुरुस्तीसाठी येतात
- पावसाळ्याच्या दिवसात सरासरी एका गॅरेजमध्ये 6 ते 8 गाड्या दुरुस्तीसाठी येतात
- E20 मुळे एका दुचाकीसाठी दुरुस्तीचा खर्च साधारणपणे 3500 ते 4000 हजार रुपये येतो
प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची सक्ती पेट्रोलियम मंत्रालयानं केलीय...कंपन्या मात्र e-20ला सुसंगत नसलेल्या गाड्या विकतायत. त्याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागतोय. त्यामुळे सरकारनं एकतर इथेनॉलच्या टक्केवारीनुसार गाड्य़ांच्या उत्पादनावर भर द्यावा किंवा ज्याची गाडी जेवढं इथेनॉल पचवू शकते त्यानुसार पंपावर पेट्रोल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागलीय.