विरोधकांच्या टार्गेटवर आता गडकरी, E20 पेट्रोलविरोधात रस्त्यावरची लढाई

E20 Debate Escalates as Protests Spread Across India: नीट पेपरफुटीनंतर आता देशात E20 पेट्रोलवरून वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे प्रधानानंतर विरोधकांच्या निशाण्यावर अमित शाहांसह नितीन गडकरीही आलेत...पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Protesters raise slogans against E20 petrol policy as opposition leaders target Union Minister Nitin Gadkari
Protesters raise slogans against E20 petrol policy as opposition leaders target Union Minister Nitin Gadkarisaam tv
Published On

E20वरून देशव्यापी आंदोलन पेटणार

देशभरात सध्या ई२० इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून जोरदार राजकीय रणकंदन पाहायला मिळतय... 'आम आदमी पार्टी'नं E20 पेट्रोलवर आक्रमक भूमिका घेतलीय...अरविंद केजरीवाल यांनी 4 ऑगस्टला पंतप्रधान निवासस्थानापर्यंत लाँग मार्च करण्याची घोषणा केलीय. तसचं 2 लाख नागरिकांच्या E20विरोधात ऑनलाइन स्वाक्षऱ्या घेऊन ते पंतप्रधानांना देणार असल्याची भूमिकाही केजरीवालांनी मांडलीय...

एकीकडे दिल्लीत अरविंद केजरीवाल आक्रमक झाले असतानाच, नागपुरात काँग्रेसनेही E20विरोधात थेट रस्त्यावरची लढाई सुरु केलीय...E20विरोधात नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला....आंदोलकांनी थेट बॅरीकेड्सवर चढून त्यांच्या निवास्थानाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं.

त्यामुळेच आता धर्मेंद्र प्रधानांनंतर गडकरींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलीय. ठाकरेसेनेनं तर गडकरीच नव्हे. पंतप्रधानांचीही राजीनामा घेण्याची मागणी केलीय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CJP आंदोलकांनी E20चा मुद्दा पहिल्यांदा समोर आणला होता... त्यावेळी आंदोलनातही ठिकठिकाणी E20विरोधात पोस्टबाजी करण्यात आली होती... मात्र आता E20 पेट्रोलच्या मुद्यावरून निर्माण झालेला हा वाद आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता याविरोधात विरोधकांनी आता रस्त्यावरची लढाई सुरू केलीय. त्यामुळे आता गडकरींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com