U.S. Citizenship : अमेरिकेत खळबळ! महिलांची प्री डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये रांग, कारण काय?

U.S. birthright citizenship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील भारतीय महिलांनी प्री डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
U.S. Citizenship
U.S. Citizenship NewsSaam tv
Published On

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतल्यांतर निर्णयाचा धडाका लावला. ट्रम्प यांनी जन्मआधारित नागरिकत्वाबाबतही महत्वाचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, अमेरिकेत जन्म घेणाऱ्या सर्व मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाने अमेरिकेत खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या निर्णयाचा तेथील स्थानिकांना त्रास नाही. परंतु या निर्णयाने दुसऱ्या देशातून अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या लोकांची डोकेदुखी वाढली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माआधारित नागरिकत्व संपुष्टात आणण्याचा आदेश लागू केला आहे. या आदेशाची अंतिम मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही अंतिम मुदत संपल्यानंतर अमेरिकेत जन्म झालेल्या प्रत्येक मुलांना तेथील नागरिकत्व मिळणार नाही. ट्रम्प यांचा हा आदेश अमेरिकेच्या नागरिकांसाठी नाही. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आई-वडिलांनी रुग्णालयांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

U.S. Citizenship
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा; सर्व ३४ आरोपांमधून निर्दोष मुक्तता, काय आहे संपूर्ण प्रकरण?

भारतीय वंशाच्या बहुतांश महिला सी-सेक्शनमार्फत जन्म देण्याचा निर्णय घेत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी या महिलांची रुग्णालयांसमोर मोठी रांग पाहायला मिळत आहे. ४७ वे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांनी एका आदेशावर सही केली. ट्रम्प यांच्या एका सहीनंतर मुलांना जन्मआधारित नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे या मुलाचे आई-वडील अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत आहेत, असे सिद्ध होऊ शकते. दरम्यान, या आदेशात अमेरिकेचे नागरिक असलेल्या महिलांच्या मुलांचा समावेश नसेल.

U.S. Citizenship
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या

१९ फेब्रुवारीपासून नियमात होणार बदल

ट्रम्प यांचा आदेश हा १९ फेब्रुवारीपासून लागू होईल. त्यानंतर अमेरिकेचे नागरिक नसलेल्या आई-वडिलांना अमेरिकेचे नागरिक मानले जाणार नाही. हा आदेश तात्पुरत्या स्वरुपात अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना बसणार आहे. पर्यटन व्हिसा, विद्यार्थी व्हिसा, नोकरी व्हिसावर अमेरिकत आलेल्या नागरिकांसाठी हा आदेशाचा लागू होणार आहे.

U.S. Citizenship
Donald Trump : अमेरिकेतल्या १८ हजार भारतीयांवर घरवापसीची टांगती तलवार | VIDEO

काही महिला १९ फेब्रुवारीच्या आधी बाळाचा जन्म व्हावा, यासाठी हॉस्पिटलमध्ये सी-सेक्शनची मागणी करू लागल्या आहेत. मूळची भारताची असलेली प्रिया म्हणते , माझी डिलिव्हरी ही मार्च महिन्यात होणार आहे. माझ्या डिलिव्हरीमुळे अमेरिकेचं नागरिकत्व मिळण्याविषयी चिंता नव्हती. आम्ही मागील सहा वर्षांपासून अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळावं, यासाठी वाट पाहत आहे. मात्र, नियम बदलल्याने भीती वाटू लागली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com