चालत्या गाडीची बदलणारी नंबर प्लेट, वाहतूक दंड टाळण्यासाठी शक्कल

High-Tech Fraud: वाहतुक दंड टाळण्यासाठी एका डॉक्टरनं नवी शक्कल लढवलीय... कारची क्षणार्धात बदलणारी नंबर प्लेट नेमकी कशी आहे? रिमोट कंट्रोल नंबर प्लेटचा वापर करून डॉक्टर वाहतुक पोलिसांना कसा गंडा घालत होता... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
BMW fitted with a remote-controlled flip number plate system seized by Hyderabad police
BMW fitted with a remote-controlled flip number plate system seized by Hyderabad policesaam tv
Published On

हॉलिवूड चित्रपटात व्हिलन पोलिसांना चकवा देण्यासाठी एका रिमोट कंट्रोलवर गाडीची नंबर प्लेट बदलत असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण असाच काहीसा धक्कादायक प्रकार हैदराबादच्या हायप्रोफाईल ज्युबिली हिल्स परिसरात प्रत्यक्षात घडलाय..एक सुशिक्षित डॉक्टर, आलिशान बीएमडब्ल्यू कार आणि पोलिसांना गंडा घालण्यासाठी बसवलेलं 'रिमोट कंट्रोल' यंत्र..यामुळे संपूर्ण हैदराबाद हादरलयं....धूर्त डॉक्टरने पोलिस यंत्रणेला कसा चकवा दिलाय ते ..पाहूयात...

ज्युबिली हिल्स परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करत असताना एका बीएमडब्ल्यू कारचालकाला पोलिसांनी अडवलं...गाडीत बसलेला डॉ. गौतम रेड्डी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं ब्रेथलायझर चाचणीत समोर आलं...त्यानंतर गाडीची तपासणी केल्यावर पोलिसांना गाडीत रिमोट कंट्रोल फिल्प नंबर प्लेट प्रणाली बसवल्याचं आढळलं...या सिस्टममुळे गाडी सुरु असताना चालकाला क्षणार्धात नंबर प्लेट बदलता येते.. यातील एक नंबर प्लेटचं रजिस्टेशन दिल्लीचं तर दुसरं तेलगंणातील असल्याचं ही समोर आलाय..मात्र अशी रिमोट कंट्रोल फिल्प नंबर प्लेट बसवणं बेकायदेशीर आहे...

दरम्यान वाहतुक दंड टाळण्यासाठी डॉक्टरनं हे कृत्य केल्याचा पोलीसांना संशय आहे.. पोलिसांनी आता ती बीएमडब्ल्यू जप्त केलीय. तसंच आरोपी डॉक्टवर वाहतुक नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आलाय... मात्र तंत्रज्ञानाचा वापर कायद्यापासून पळवाट काढण्यासाठी होत असल्यानं रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय...त्यामुळे अशा हायटेक धुर्त वाहनचालकांना आवरणं हे वाहतुक पोलिसांसमोर मोठं आव्हानं असणार आहे...हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com