दिवाळी म्हटलं की दिवे, मिठाई आणि फटाक्यांचा आनंद आलाच. मात्र, हाच आनंद कधी मोठ्या संकटाचं कारण ठरू शकतो, याची जाणीव हैदराबादमधील एका घटनेमुळे झाली आहे. दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडताना सहा जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे फटाके फोडताना किती काळजी घेणं गरजेचं आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी काही जण फटाके फोडत असताना अचानक त्यांच्या डोळ्यांना इजा झाली. या सहाही जणांच्या डोळ्यांतून रक्त येऊ लागल्याची माहिती समोर आली आहे. फटाक्यांमधून उडालेले जळते कण किंवा स्फोटाचा परिणाम यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे.
या घटनेतील जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे या घटनेची गंभीरता आणखी वाढली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. फटाके फोडताना अनेकदा लहान मुलांसह मोठेही निष्काळजीपणा करतात. हातात फटाके पेटवणे, पेटलेला फटका पुन्हा उचलण्याचा प्रयत्न करणे किंवा फटाके चेहऱ्याजवळ फोडणे अशा चुका गंभीर अपघातांना कारणीभूत ठरू शकतात.
विशेष म्हणजे, डोळे हा शरीरातील अत्यंत नाजूक अवयव आहे. फटाक्यांच्या ठिणग्या, धूर किंवा स्फोटामुळे डोळ्यांना मोठी इजा होऊ शकते. काही वेळा अशा दुखापतींमुळे कायमची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे दिवाळी साजरी करताना आनंदासोबत सुरक्षिततेचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीशिवाय फटाके फोडू देऊ नका. डोळ्यांना दुखापत झाल्यास डोळे चोळू नका आणि तातडीने डॉक्टरांकडे जा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.