Diwali 2025: आदर्श दिवाळी! ना भुईचक्र, ना सुतळी बॉम्ब... ३० वर्षांपासून या गावात एकही फटाका फोडला नाही

Diwali 2025 Special Story Tamilnadu Kollukudipatti: दिवाळीनिमित्त घराघरात दिवे लावले जातात. लहान मुले फटाके फोडतात. परंतु देशात असं एक गाव आहे जिथे एकही फटाका फोडला जात नाही.
Tamilnadu Kollukudipatti
Tamilnadu KollukudipattiSaam tv
Published On

दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत घराघराग गोडाचे पदार्थ बनवतात, फटाके फोडले जातात. अनेक ठिकाणी लायटिंग केली जाते. दरम्यान, या फटाक्यांमुळे वायू प्रदुषण, ध्वनीप्रदुषण होते. त्यामुळे आपणच जास्त प्रमाणात फटाके फोडणे टाळले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत. जिथे दिवाळीत एकही फटाका फोडला जात नाही.

Tamilnadu Kollukudipatti
Diwali 2025 : देशभरात धनतेरसचा उत्साह! सुवर्ण, चांदी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी |VIDEO

फटाके फोडल्याने वायूप्रदुषण, ध्वनीप्रदुषण होते. याचसोबत पक्ष्यांना त्रास होतो. त्यामुळे या गावाने फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमधील कोल्लुकुडिपट्टी या गावाने हा निर्णय घेऊन एक इतिहास रचला आहे.

या गावात फटाके फोडणे वर्षानुवर्षे बंद आहे. या गावाजवळच वेत्तानगुडी बर्ड सँच्युरी आहे. ही दक्षिण भारतातील सर्वात जुनी सँच्युरी आहे. हे अभयारण्या ३८.४० हेक्टरमध्ये पसरले आहेत.येथे अनेक पक्षी आहेत. हिवाळ्यात तर येथे २०० पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी असतात. त्यामुळे या पक्षांना त्रास होऊ नये, यामुळेच या गावाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

या अभयारण्यात बगळे, करकोचे, आयबीज असे पक्षीही येतात. अनेक दुर्मिळ प्रजातीचे प्राणीदेखील या अभयारण्यात पाहायला मिळतात. या पक्ष्यांचे जतन व्हावे, पक्ष्यांनी या अभयारण्यात वास्तव्य करावे, यासाठी तेथील रहिवासी काळजी घेतात.

कोल्लुकुडीपट्टी गावात लोक शांततेत दिवाळी साजरी करतात. येथे दिवे लावतात, घरे सजवतात आणि एकत्र येऊन शांतपणे दिवाळी साजरा करतात. हे वातावरण पक्ष्यांना संरक्षण देत नाही तर पर्यावरणाचीही काळजी घेतात. गावकऱ्यांना असा विश्वास आहे की, जेव्हा हे पक्षी तलावात येतात तेव्हा पिके भरभराटीला येतात. पक्ष्यांच्या आगमनाने चांगला पाऊस पडतो.

Tamilnadu Kollukudipatti
Diwali 2025 : दिवाळीला कुछ तो मीठा हो जाये; घरीच झटपट बनवा ४ मिठाई

पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा

या गावातील रहिवासी सांगतात की, ही परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत आली आहे. येथील रहिवासी पक्ष्यांसोबत शांतता राखण्याचे महत्त्व सांगतात. निसर्गाची काळी घेतात. ह निसर्गाशी एकरुप होऊ राहणे ही या समाजाता श्रद्धा मानली जाते. त्यामुळे या गावात पशु-पक्ष्यांची खूप काळजी घेतली जाते.

Tamilnadu Kollukudipatti
Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com