ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीला लोक घरच्या घरी मिठाई बनवतात. जर तुम्हाला ही मिठाई बनवायच्या असतील तर जाणून घ्या झटपट होणा-या मिठाईंची रेसिपी.
काजू कतली ही एक अशी मिठाई आहे जिचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. ही बाजारात सर्वाधिक विकली जाणारी मिठाई आहे.
काजू कतली तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. छोटे काजू, साखर आणि खवा मिसळून घरी खूप लवकर बनवता येते.
दिवाळीकरिता बेसनचा लाडू बनवू शकता. बेसन, तूप आणि साखर मिसळून बेसनचा लाडू बनविले जाऊ शकतात.
बेसनाच्या लाडूंमध्ये तुम्ही सुकामेवा, वेलची आणि केशर घालू शकता. यामुळे लाडूंची चव वाढते.
घरच्या घरी बनवा श्रीखंड. हा झटपट तयार होणारा लोकप्रिय गोड पदार्थ आहे. श्रीखंड दही आणि साखरेपासून बनवले जाते.
तुमच्या मिठाईच्या यादीत बालुशाहीचा समावेश नक्की करा. ही मिठाई बनवण्यास अगदी सोपी आहे. पीठ, तूप आणि साखर वापरून बालुशाही बनवली जाते.