वृत्तसंस्था: मागील काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात (Education Sector) समस्या वाढताना दिसून येत आहेत. मान्यता नसताना देखील अभ्यासक्रम चालवणे, विद्यार्थ्यांकडून फी वसूल करणे, पुरेशा शैक्षणिक सुविधा न देणे इत्यादी समस्या वाढताना दिसून येत आहेत. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे (students) शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. या प्रकारांमुळे सर्वसामान्य कुटुंबांत विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागला आहे. मात्र अशा समस्या निर्माण झाल्यास योग्य न्याय मिळण्याची शक्यता धूसर असल्यामुळे विद्यार्थी अधिकच चिंताग्रस्त आणि हतबल होताना दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या अशाच अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (Demand of MBBS students to the President)
हे देखील पहा-
उत्तर प्रदेशामधील सहारनपूर मधील (Saharanpur) वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी इच्छा मरणाला परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रपतींकडे (President) केली आहे. ग्लोकल मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द झाल्याने वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मागील काही वर्षांपासून विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र, आतापर्यंत या महाविद्यालयाला मान्यता मिळालेली नाही. कोणत्याही न्याय मिळत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहर दंडाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देत इच्छा मरणाला परवानगी देण्याची मागणी केली आहे. मान्यता नसताना अंधारात ठेवून लाखो रुपयांची फी वसूल केली असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.
सहारनपूर जिल्ह्यामधील बसपाचे विधान परिषद सदस्य आणि खाण व्यावसायिक मोहम्मद इक्बाल यांची ही ग्लोकल युनिव्हर्सिटी आहे. मात्र, या युनिव्हर्सिटीला मान्यता न मिळाल्याने आता विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. यामुळे आम्हाला इच्छा मरणासाठी परवानगी द्यावी', अशी मागणी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात शहर दंडाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये, २०१६ मध्ये ग्लोकल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. आम्ही सतत ३ ते ४ वर्ष एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास सुरू ठेवला. २ वर्षं शिक्षण घेतल्यावर ३ महिन्यामध्ये आम्हाला डिस्चार्ज मिळाल्याचे समजले आहे. परंतु, याविषयी कॉलेज व्यवस्थापनाने याविषयी कोणतीही माहिती न देता, आमच्याकडून फी वसूल केल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले आहे.
यानंतर विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, तिथे देखील त्यांना न्याय मिळालेला नाही. ग्लोकल मेडिकल कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे ३० ते ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत. यापुढे खर्च करण्याची आमची स्थिती नाही. यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.