Corona Vaccine Death: खळबळजनक! औरंगाबादेत लसीच्या डोसनंतर विद्यार्थिनीचा मृत्यू

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणाम एका वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
Corona Vaccine Death: खळबळजनक! Aurangabad लसीच्या डोसनंतर विद्यार्थिनीचा मृत्यू
Corona Vaccine Death: खळबळजनक! Aurangabad लसीच्या डोसनंतर विद्यार्थिनीचा मृत्यूSaam Tv

अविनाश कानडजे

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणाम एका वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. दिलीप लुणावत यांनी मुलीच्या मृत्यूकरिता १ हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई (Compensation) ची मागणी केली आहे. माझी मुलगी स्नेहल हिला लस घेण्याअगोदर संबंधित लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. स्नेहल ही एक आरोग्य (Health) सेविका होती. यामुळे तिला लस घेण्यास भाग पाडले होते. तिने लस (Vaccine) सुरक्षित असल्याच्या हमीच्या आधारे लस घेतली होती. मात्र, लस सुरक्षित असण्याचा दावा खोटा ठरला आहे. तिचा लसीच्या दुष्परिणामांमुळे तिचा मृत्यू झाला आहे, असा खळबळजनक दावा करत याचिकाकर्ते लुणावत यांनी भरपाईची मागणी केली आहे.

हे देखील पहा-

लुणावत यांनी आपल्या याचिकेमध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या संचालकाला देखील जबाबदार धरले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या संचालकांनी कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. खरेतर हा दावा खोटा असल्याचे मुलीच्या मृत्यूमुळे सिद्ध झाले आहे, असे लुणावत यांनी याचिकेमध्ये सांगितले आहे. डिसीजीआय आणि एम्सच्या पोकळ याच्या दाव्यांमुळे माझ्या मुलीसारख्या आरोग्य कर्मचार्‍यांना लस घेणे भाग पडले, याकडे लुणावत यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

Corona Vaccine Death: खळबळजनक! Aurangabad लसीच्या डोसनंतर विद्यार्थिनीचा मृत्यू
Pune Breaking: 55 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी भाजपाचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना अटक

याचिकेमध्ये म्हटल्यानुसार, लुणावत यांची मुलगी स्नेहल हिने २८ जानेवारी २०२१ दिवशी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्या लसीच्या डोसचा दुष्परिणाम होऊन स्नेहलचे १ मार्च २०२१ रोजी निधन झाले होते. केंद्र सरकारच्या AEFI समितीनेही स्नेहलचा मृत्यू कोविशील्ड (Covishield) लसीच्या दुष्परिणामांमुळे झाल्याचे मान्य केले आहे. माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता तसेच प्रतिवादी अधिका-यांच्या बेकायदेशीर कृतीमुळे आणखी काही लोकांच्या जीविताला असलेला संभाव्य धोका रोखण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे, असे म्हणणे लुणावत यांनी मांडले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com