पुणे: पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक (Former Deputy Mayor and current Councilor) केशव घोळवे यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक (Keshav Gholave Arrested) केली आहे. पिंपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना (merchants) मेट्रोचे गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५५ हजार रुपये लुटल्याचा त्यांच्यावर आरोप (Allegations) करण्यात आला आहे. घोळवे यांनी २०१९पासून अनेक व्यापाऱ्यांकडून भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संघटनेकरिता १२०० रुपयांची पावती करण्यासह भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर यावेळी लावला आहे.
हे देखील पहा-
घोळवे यांनी फिर्यादी व्यापाऱ्याकडून ५५ हजार रुपये खंडणी उकळली आहे. यानंतर घोळवे फिर्यादीकडे १ लाख रुपयांची मागणी करत होते. पण पैसे देण्यास नकार दिल्याने घोळवे यांनी याविषयी व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मोहम्मद तय्यब अली शेख असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी पैसे देण्यास विरोध केला होता. घोळवे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानवर व्यापारी मोहम्मद शेख यांनी पिंपरी पोलीस स्टेशन ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर रात्री उशिरा चौकशी केल्यावर पोलिसांनी भाजपचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह गुड्डू उर्फ प्रमोद यादव, मलका यादव, घनश्याम यादव आणि हसरत अली शेख यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.
दुसरीकडे, केशव घोळवे यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांनी केला आहे. या प्रकरणी आपण वरिष्ठांना तक्रार करणार असून घोळवे यांच्यावर कारवाई राजकीय दबावातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या अगोदर देखील होर्डिंग लावण्याकरिता २ लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. यावेळी पोलिसांनी भाजपच्या विद्यमान स्थायी समिती अध्यक्षाला अटक करण्यात आली होती.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.