

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनादरम्यान तणाव वाढला
आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज
गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला
या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पुन्हा गोंधळ झाला आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. तसंच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यावेळी आक्रमक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
जंतर- मंतरहून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी टॉल्स्टॉय मार्गावर रोखले. या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि हवाई दलाने आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि वारंवार अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर आंदोलक आणि पोलिस आमने सामने आले आहेत. सध्या जंतर-मंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
टॉलस्टॉय मार्गावर याआधी देखील दोन वेळा दिल्ली पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आले होते. आता पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज केल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. पोलिस या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. गर्दी पांगवण्याचा आणि गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे आंदोलक जास्तच आक्रमक झाले. पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळावर घेरावबंदी केली आहे.
पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने सांगितले की, 'जंतर-मंतर हे तुरूंग किंवा लष्करी क्षेत्र नाही. तर ते भारतातील लोकशाही आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण आहे. शांततापूर्ण आंदोलकांना दिली जाणारी वागणूक अस्वीकार्य आहे. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर येणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेणं आणि त्यांना धमकावणे थांबवावे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.