

Delhi News: दिल्लीतील (Delhi) भजनपुरा परिसरात रविवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात आली. रस्त्यावरील मंदिर आणि मशीदीवर प्रशासनाने बुलडोजर चालवला. प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांचा (Delhi Police) कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या कारवाईपूर्वी पोलीस अधिकाऱ्याने जे काम केलं आहे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मंदिरावर बुलडोजर (removes illegal dargah and temple) चढवण्यापूर्वी या पोलीस अधिकाऱ्याने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले त्यानंतर ही कारवाई केली.
दिल्लीतील भजनपुरा येथील रस्त्यावरील अनधिकृत बांधण्यात आलेले मंदिर आणि मशीदीवर आज सकाळी प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला. मंदिर पाडण्यापूर्वी अतिरिक्त डीसीपी सुबोध गोस्वामी यांनी स्वत: मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. त्यानंतरच मंदिरावर बुलडोजर चालवण्यात आला. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात केले आहे.
वजिराबाद रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. यावेळी दिल्ली पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलीस ड्रोनच्या सहाय्याने परिसरावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी अतिक्रमण कारवाईच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून परिसर सील केला आहे. पीडब्ल्यूडीच्या आदेशानुसार ही संपूर्ण कारवाई करण्यात येत आहे.
याठिकाणी उड्डाणपूल बांधला जात आहे. त्याचसोबत रस्ता रुंदीकरणाचाही विचार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. याला अडथळा निर्माण होत असल्याने मंदिर आणि मशीद हटवून अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अतिक्रमण हटवल्याने येथील लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. भजनपुरा चौकात अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळेच ही अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे याठिकाणच्या नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
यापूर्वीही रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास लोकांनी विरोध केला होता. मंदिर आणि मशीद हटवल्यानंतर लवकरच या जागेचे सपाटीकरण करून रस्त्याचे स्वरूप दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणी उपद्रव पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या मेहरौलीमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली होती. चार इमारतींमध्ये बांधलेले 50 हून अधिक फ्लॅट डीडीएच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले. तेव्हा हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.