Loksabha Election: स्वत: हजारो कोटी घेतले, आमची बँक खाती गोठवण्याचा कट; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

Congress Press Conference On Electoral Bond: लोकसभा निवडणुकींची घोषणा होताच देशभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच इलेक्टोरल बॉन्डवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे.
Congress Press Conference On Electoral Bond:
Congress Press Conference On Electoral Bond: saam tv
Published On

Congress Press Conference:

लोकसभा निवडणुकींची घोषणा होताच देशभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच  इलेक्टोरल बॉन्डवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. आज दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये  इलेक्टोरल बॉन्डवरून भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?

"निवडणुकीच्या तोंडावर आमचे बँक अकाऊंट गोठवली आहेत. जर निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या असतील तर आम्हाला आमचे अकाऊंट वापरू द्या. हे सगळे निर्णय फक्त काँग्रेस बाबत लागू होत आहे. भाजपने कधीही त्यांचं अकाऊंट दिलं नाही. आम्ही न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत आहोत, आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालय आम्हाला न्याय देईल," असे म्हणत इलेक्टोरल बाँन्डवरुन काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

तसेच "निवडणूक रोख्यांचा फायदा फक्त भाजपला झाला. दुसरीकडे आमची म्हणजे मुख्य विरोधी पक्षाची खाती गोठवली जात आहेत. काँग्रेसला फंड मिळू नये असे पंतप्रधानांना (PM Narendra Modi) वाटते. आमचे काऊंट आहेत ते फ्रिज करायला सांगितली आहेत. निवडणूक रोखे घटनाबाह्य असल्याचा सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला, काँग्रेसला फक्त ११ टक्के निवडणूक रोखे मिळाले, असे सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Congress Press Conference On Electoral Bond:
Madha Lok Sabha Constituency: धैर्यशील मोहिते पाटील यांना वाडेगावमध्ये बैठक न घेताच गाव साेडावं लागलं, नेमकं काय घडलं?

तसेच "हा मुद्दा काँग्रेससाठीच (Congress) नव्हे तर लोकशाहीसाठी धोकादायक आहे. जनतेने दिलेला पैसा लुटला जात आहे. हे अलोकतांत्रिक आहे. आम्ही स्वतःचा प्रचारही करू शकत नाही. 115 कोटी रुपये प्राप्तिकर सरकारकडे वर्ग करण्यात आला. कुठे आहे ही लोकशाही? तुम्ही (जनतेने) आम्हाला साथ दिली नाही तर आमची किंवा तुमची लोकशाही राहणार नाही," असे आवाहनही काँग्रेस नेत्यांनी यावेळी केले. (Latest Marathi News)

Congress Press Conference On Electoral Bond:
Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com