Delhi News: दिल्लीत एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीत एका जिममध्ये जीवायएममध्ये वर्कआऊट करत असताना ट्रेडमिलमध्ये विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. याप्रकरणी जिम चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना दिल्लीतील (Delhi) रोहिणी येथील आहे. रोहिणी सेक्टर 19 मध्ये राहणारा सक्षम प्रुथी हा रोहिणी परिसरातील फिटनेस झोनमध्येच व्यायाम करत होता. जेव्हा सक्षम व्यायामात मग्न होता. त्यावेळी जीमच्या ट्रेडमिलमध्ये करंट वाहू लागला. या विजेच्या धक्क्याने सक्षम काही क्षणातच बेशुद्ध झाला.
इतरांनी त्याला उचलण्यासाठी धाव घेतली आणि ट्रेड मिल बंद झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आधी हृदयविकाराचा झटका आल्याने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असता मृत्यूचे खरे कारण समोर आले.
या अहवालात ट्रेडमिलमध्ये विजेचा धक्का लागल्याने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. हा तरुण गुरुग्रामच्या एका कंपनीत कामाला होता. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी सक्षमच्या नातेवाइकांनी जिमचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.