Kalyan Crime News : ९ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा अखेर उलगडा; हत्या करून पुरावा केला होता नष्ट

९ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा अखेर उलगडा; हत्या करून पुरावा केला होता नष्ट
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण ग्रामीण परिसरातील हेदूटणे गावात पाण्याच्या टँकर व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नऊ महिन्यांपूरवी घडली होती.. मात्र या प्रकरणी कामगाराची हत्या (Crime News) झाल्याचा संशय आल्याने मयताच्या कुटुंबाने या प्रकरणी चौकशीची मागणी केली. आधी मानपाडा पोलीस ठाणे नंतर (Kalyan) ठाणे क्राईम ब्रँचकडून तपास सुरू करत हत्येचा उलगडा झाला. (Maharashtra News

Kalyan Crime News
Beed News : मनसे सैनिकाचे अनोखे आंदोलन; रस्त्यासाठी थेट रस्त्यावरील खड्ड्यातचं केली अंघोळ

कल्याण ग्रामीण भागात हेदूटणे परिसरात राहणारे विजय पाटील आणि नितीन पाटील यांचा टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे संतोष करकटे हा टँकरची नोंद करण्याचे काम करत होता. विजय यांनी संतोष सरकटे याच्याकडे आपले बेकायदेशीर असलेले रिव्होलव्हर सांभाळण्यासाठी दिले होते. मात्र संतोषकडून हे रिव्होलव्हर गहाळ झाले. यानंतर संतोषने जाणीवपूर्वक ते गहाळ केल्याचा आरोप करत या दोघांनी त्याला डांबून ठेवत ८ दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हे कृत्य लपवण्यासाठी या दोघांनी संतोषच्या मृत्यूनंतर स्थानिक डॉक्टरकडून त्याचा मृत्यू अती दारूच्या सेवनामुळे झाल्याचे प्रमाणपत्र घेत नातेवाईकाकडून मृतदेहावर इलेक्ट्रिक शवदाहिनीत घाईगडबडीत अन्त्य संस्कार उरकले. हि घटना ऑक्टोबर २०२२ मध्ये घडली होती. मात्र संतोषची हत्या झाल्याचा संशय असलेल्या नातेवाईकानी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार करत चौकशीची मागणी केली. मात्र अर्जाचा विचार न झाल्याने त्यांनी  ठाणे क्राइम ब्रांचकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती.

Kalyan Crime News
Nashik News : मोबाइलचे बनावट साहित्य विकणाऱ्यांवर छापे; पाच लाखाचे बनावट साहित्य जप्त

दोन आरोपी ताब्यात 

मागील नऊ महिन्यापासून नातेवाईक न्यायासाठी धडपड करत होते. अखेर  दहा दिवसांपूर्वी हा अर्ज चौकशीसाठी एसिपी कुऱ्हाडे यांच्याकडे प्राप्त झाला. डॉक्टरकडून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद पोलिसात (Police) का करण्यात आली नाही? या प्रश्नावरून चौकशी सुरू करत दहा दिवसांत नातेवाइकाकडून घटनेचा उलगडा करत  याप्रकरणी विजय पाटील आणि नितीन पाटील या दोन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याना मदत करणारा तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले. तर या प्रकरणी संबंधित डॉकटरने याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना न कळवल्याने हा डॉक्टर देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com